नवी दिल्ली : चॅट जीपीटीने टेक जगतात धुमाकूळ घातला आहे. मात्र आता मायक्रोसॉफ्ट कंपनीने टेक जगतात हवा करण्याची तयारी सुरू केली आहे. लवकरच यूझरला CoPilot ची सुविधा देण्यात येणार असल्याचा मायक्रोसॉफ्ट कंपनीने दावा केला आहे. हे टूल मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस पॅकेजसह येमार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ऑफिसचे काम सहजतेने करण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजेच CoPilot अधिकृत पत्रांचा मसुदा तयार करण्यात, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करण्यात आणि रोजच्या ऑफिसमध्ये येणारी इतर अनेक छोटी कामे करण्यात कुशल आहे. त्यामुळे तासनतास वेळ घेणारे काम यामुळे काही वेळातच होणार आहे.
ओपन एआयच्या धर्तीवर करणार काम : ओपन एआयने आणलेल्या चॅट जीपीटीमुळे टेक जगतात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण केली आहे. मात्र आता त्याच धर्तीवर मायक्रोसॉफ्टही टूल आणणार आहे. त्यामुळे टेक जगतात आणखी स्पर्धा निर्माण झाली आहे. CoPilot हे तुमच्या गरजेनुसार काम करणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनमध्ये कोणते चित्र टाकायचे, कोणते अॅनिमेशन जोडायचे, त्याची रचना काय असेल हे ठरवून तुमचे सादरीकरण कायापलट हे टूल तयार करेल. CoPilot हे जगातील सर्वात शक्तिशाली उत्पादकता साधन सिद्ध होणार असल्याचा दावा मायक्रोसॉफ्ट कंपनीने केला आहे. हे टूल ओपन एआयच्या GPT 4 फॉर्म्युलावर काम करणार असल्याचेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच आगामी काळात CoPilot हा तुमचा ऑफिस असिस्टंट असणार असल्याचा दावाही कंपनीने केला आहे.
मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी दिली माहिती : मायक्रोसॉफ्ट कंपनी लवकरच तुम्हाला को पायलट नावाचे टूल कंपनीच्या वतीने जारी करण्यात येणार असल्याची माहिती मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी कंपनीच्या एका कार्यक्रमात दिली आहे. यावेळी सत्या नडेला यांनी आम्ही तुमचे ऑफिसचे काम सोपे करणार आहोत. नैसर्गिक भाषा ही भविष्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्याशिवाय भविष्यातील संगणकाचा आपण विचारही करू शकत नाही. मायक्रोसॉफ्ट लवकरच 'को-पायलट' नावाचे एआय वापरण्यास सक्षम असणार आहेत. हा टूल एआयच्या आधारावर काम करत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
एका इशाऱ्यावर करेल तुमचे सगळे काम : मायक्रोसॉफ्टने आणलेल्या या नवीन टूल्सबाबत नडेला यांनी सविस्तर माहिती दिली. हे टूल तुमच्या एका इशाऱ्यावर तुमचे सगळे काम करेल. सध्या आम्ही संगणकाच्या पुरेपूर शक्तीचा वापर करत नाही. मात्र हे टूल आल्यानंतर ती कमीही पूर्ण होणार असल्याचे नडेला यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यावेळी सत्या नडेला यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या पॉवर पॉइंट अॅपचे उदाहरण दिले. ते म्हणाले की सध्या वापरकर्ते पॉवर पॉइंट अॅपवर उपलब्ध असलेल्या 10 टक्के टूल्सचा वापर करत नाहीत. त्यामुळे Copilot त्याची पूर्ण क्षमता वापरुन काम करेल. वापरकर्त्याला यापुढे एमएस एक्सेलचे लांब आणि गुंतागुंतीचे सूत्र लक्षात ठेवण्याची गरज नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यामुळे तुमच्या एक इशाऱ्यावर काही सेकंदात तुमचे काम करणारे टूल विकसित केल्याचा दावा कंपनीने केला आहे.
हेही वाचा - Apple iPhone 15 Pro : आयफोन 15 लाइनअपची घोषणा; मॉडेल्सची किंमत वाढू शकते