नवी दिल्ली : पृथ्वीवर जीवांची उत्पती ही पाण्यातून झाल्याचा दावा अनेक शास्त्रज्ञ करतात. पाण्यातून अगोदर जीवांची उत्पत्ती झाली, त्यानंतर त्या जीवांचा विकास होत जाऊन मानव आणि जीवसृष्टी बनल्याचे स्पष्ट करण्यात येते. मात्र पृथ्वीवरील जीवन समृद्ध होण्यासाठी सायनोबॅक्टेरिया ( cyanobacteria ) अर्थात 'काई' याची महत्वाची भूमिका असल्याचा दावा बनारस हिंदू विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. सायनोबॅक्टेरिया ही एकपेशीय वनस्पती (cyanobacteria ) कोणत्याही जागेवर विकसित होऊ शकत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका : सायनोबॅक्टेरियाने सुमारे 3 अब्ज वर्षांपूर्वी वातावरणात प्रथमच ऑक्सिजन तयार केला. त्यानंतर सध्याच्या ऑक्सिजेनिक जीवनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा बनारस हिंदू विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. सायनोबॅक्टेरिया हे प्रमुख कार्बन डायऑक्साइड आणि डायनायट्रोजन फिक्सर असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे.
हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्याची क्षमता : कार्बन डाय ऑक्साईडमुळे होणाऱ्या जागतिक हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी सायनोबॅक्टेरिया महत्वाची भूमीका बजावत असल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. यासाठी पायलट प्लांटची स्थापना केली जात आहे. बनारस हिंदू विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागातील संशोधक डॉ शैलेंद्र प्रताप सिंग यांच्या नेतृत्वात जैवइंधन उद्योगासाठी याबाबतचे संशोधन करण्यात येत आहे. त्यानुसार सायनोबॅक्टेरियाला फोटोइंजिनियरिंग आणि अनुवांशिक अभियांत्रिकी तंत्र वापरुन त्यावर संशोधन करण्यात येत असल्याची माहिती संशोधक डॉ शैलेंद्र प्रताप सिंग यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेला दिली.
निळ्या आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशात केली वाढ : बनारस हिंदू विद्यापीठातील संशोधक डॉ शैलेंद्र प्रताप सिंग यांच्या नेतृत्वात करण्यात येत असलेल्या या सायनोबॅक्टेरियमचा विकास निळ्या आणि हिरव्या रंगाच्या प्रकाशाखाली करण्यात आला. या दोन्ही प्रकाश पद्धतीत सायनोबॅक्टेरियमची मंद वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र बायोमास उत्पादनात होणारी घट लिपिड सामग्री आणि वाढलेल्या पेशींच्या वाढीव संख्येने भरपाई झाल्याचा दावाही या संशोधकांनी केला आहे. त्यामुळे सायनोबॅक्टेरियमचा नवीन स्ट्रेन विकसित कररण्यात येत असल्याचेही यावेळी संशोधकांनी स्पष्ट केले आहे.
बनारस हिंदू विद्यापीठाने दाखल केले पेटंट : बनारस हिंदू विद्यापीठाने केलेल्या संशोधनामुळे पृथ्वीवर जीवाच्या उत्पतीचा विकास करण्यात सायनोबॅक्टेरियाची महत्वाची भूमिका आहे. बनारस हिंदू विद्यापीठाचे हे संशोधन एल्सेव्हियर जर्नल एन्व्हायर्नमेंटल अँड एक्सपेरिमेंटल बॉटनीमध्ये प्रकाशित झाले आहे. आता विद्यापीठाने आपल्या संशोधनाचे पेटंट रजिस्टर करण्याचा प्रस्ताव दाखल केला आहे.
हेही वाचा - Microsoft Copilot AI : तासाभराचे काम आता होणार सेकंदात; मायक्रोसॉफ्टने आणले 'हे' धाकड टूल