ETV Bharat / science-and-technology

इस्रोची महामारीत अशीही 'झेप'; ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर विकसित - ISROs Shwaas oxygen concentrator

श्वास या ऑक्सिजन कॉनस्ट्रेटरमधून प्रेशर स्विंग अब्सॉर्पश्नचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे नायट्रोजन गॅस हा हवेतून वेगळा करण्यात येतो. श्वासमधून दोन रुग्णांना एकाचवेळी प्रति मिनिट दहा लिटर (एलपीएम) ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची क्षमता आहे.

oxygen concentrator
ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर
author img

By

Published : May 18, 2021, 5:36 PM IST

चेन्नई - कोरोना महामारीत ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरचा कमी पुरवठा होत असताना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) अत्यंत महत्त्वाचे संशोधन केले आहे. इस्रोने रॉकेट सेंटर व्हीएसएससीमध्ये वैद्यकीय ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर विकसित केले आहे. श्वास असे या पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरचे नाव आहे.

श्वास या ऑक्सिजन कॉनस्ट्रेटरमधून प्रेशर स्विंग अब्सॉर्पश्नचा वापर करण्यात आला आहे. या तंत्रज्ञानामुळे नायट्रोजन गॅस हा हवेतून वेगळा करण्यात येतो. श्वासमधून दोन रुग्णांना एकाचवेळी प्रति मिनिट दहा लिटर (एलपीएम) ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची क्षमता आहे. या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरमधून ९५ टक्के ऑक्सिजन मिळू शकतो. त्यामुळे ऑक्सिजनवर उपचार सुरू असलेल्या रुग्णांना दिलासा मिळू शकतो.

हेही वाचा-कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास 'ही' कंपनी कुटुंबाला १ कोटीपर्यंत करणार मदत

कॉन्स्ट्रेटरला दोन ऑक्सिजन आउटलेट-
इस्रोच्या माहितीनुसार श्वास हे २२० व्होल्ट उर्जेवर चालते. तर ऑक्सिजनचा प्रवाह प्रति मिनिट ०.५ ते १० लिटर नियंत्रित होऊ शकतो. कॉन्स्ट्रेटरला दोन ऑक्सिजन आउटलेट आहे. त्यामध्ये ८५ टक्के आणि ९५ टक्के हवेचा दबाव राहतो.

हेही वाचा-एलॉन मस्क असल्याचे भासवित क्रिप्टोकरन्सीमध्ये २ दशलक्ष डॉलरची फसवणूक

ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरमध्ये एलसीडी डिस्प्लेची सुविधा
जर ऑक्सिजनचा प्रवाह कमी शुद्ध, कमी क्षमतेने किंवा उच्च वेगाने, वेगवान दबावाने वाहत असेल तर सावधानतेचा इशारा देणारा अलार्म वाजण्याची यंत्रणा आहे. या ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरचे वजन ४२ ते ४४ किलो आहे. तर उंची ६०० मिलीमीटर, लांबी ५०० मिलीमीटर व रुंदी ४०० मिलीमीटर आहे. ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरमधील प्रवाह आणि दबाव दाखविण्यासाठी एलसीडी डिस्प्ले देण्यात आलेला आहे.

दरम्यान, ऑक्सिजन थेरपी सुरू असलेल्या कोरोनाबाधितांचे प्रमाण देशात अधिक आहे. त्यामुळे ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटरची कमतरता भासत आहे. त्यामुळे जगभरातून भारताला ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर पुरवठा करून मदत करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.