चित्रदुर्ग (कर्नाटक) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने डीआरडीओ (DRDO) आणि भारतीय वायुसेनेच्या सहकार्याने कर्नाटकातील एरोनॉटिकल टेस्ट रेंज (ATR) येथे रविवारी पहाटे लॉन्च व्हेईकल ऑटोनॉमस लँडिंग मिशनचे (RLV LEX) प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पाडले.
आज सकाळी लॅंडिंग पूर्ण : इस्रोने एका निवेदनात म्हटले आहे की, आरएलव्हीने भारतीय वायुसेनेच्या चिनूक हेलिकॉप्टरसह सकाळी 7:10 वाजता टेकऑफ केले. त्याने 4.5 किमी उंचीवर उड्डाण केले. आरएलव्हीच्या मिशन मॅनेजमेंट कॉम्प्युटर कमांडच्या आधारे पूर्वनिश्चित पिलबॉक्स पॅरामीटर्स प्राप्त झाल्यानंतर, आरएलव्हीला हवेतच 4.6 किमी उंचीवर सोडून देण्यात आले. त्यानंतर आरएलव्हीने नेव्हिगेशन, मार्गदर्शन आणि नियंत्रण प्रणाली वापरून एटीआर एअरस्ट्रिपवर सकाळी 7:40 वाजता लँडिंग पूर्ण केले.
-
India 🇮🇳 achieved it!
— ISRO (@isro) April 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ISRO, joined by @DRDO_India @IAF_MCC, successfully conducted the Reusable Launch Vehicle Autonomous Landing Mission (RLV LEX)
at the Aeronautical Test Range (ATR), Chitradurga, Karnataka in the early hours on April 2, 2023.
">India 🇮🇳 achieved it!
— ISRO (@isro) April 2, 2023
ISRO, joined by @DRDO_India @IAF_MCC, successfully conducted the Reusable Launch Vehicle Autonomous Landing Mission (RLV LEX)
at the Aeronautical Test Range (ATR), Chitradurga, Karnataka in the early hours on April 2, 2023.India 🇮🇳 achieved it!
— ISRO (@isro) April 2, 2023
ISRO, joined by @DRDO_India @IAF_MCC, successfully conducted the Reusable Launch Vehicle Autonomous Landing Mission (RLV LEX)
at the Aeronautical Test Range (ATR), Chitradurga, Karnataka in the early hours on April 2, 2023.
हेलिकॉप्टरद्वारे 4.5 किमी उंचीवर नेले : अंतराळ संशोधन संस्थेने पुढे सांगितले की, एखाद्या पंख असलेल्या वस्तूला हेलिकॉप्टरद्वारे 4.5 कि.मी. उंचीवर नेण्याची आणि त्या वस्तूची धावपट्टीवर यशस्वी लँडिंग करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. आरएलव्ही हे कमी लिफ्ट - टू - ड्रॅग रेशो असलेले स्पेस प्लेन आहे. ज्यासाठी या प्लेनचे उंच अॅंगल्सवर सुमारे 350 कि.मी. प्रतितास वेगाने लँडिंग करणे आवश्यक आहे.
2016 मध्ये प्रात्यक्षिक दाखवले होते : या आधी मे 2016 मध्ये, एचईएक्स मिशनचा एक भाग म्हणून, इस्रो ने त्याचे पंख असलेले वाहन आरएलव्ही - टीडी च्या पुन:प्रवेशाचे प्रात्यक्षिक दाखवले होते, जे लॉन्च व्हेइकल्स विकसित करण्यात एक मोठी उपलब्धी होती. त्या मोहिमेत, आरएलव्ही बंगालच्या उपसागरावर एका काल्पनिक धावपट्टीवर उतरले होते. एलईक्स मिशनने अंतिम दृष्टीकोन टप्पा गाठला जो स्वायत्त आणि हाय - स्पीड (350 किमी प्रतितास) लँडिंगचे प्रदर्शन करणार्या रि - एंट्री रिटर्न फ्लाइट मार्गाशी संबधीत आहे.