सॅन फ्रास्निस्को : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Instagram ) आता फीडमधील व्हिडिओंसाठी ऑटोमेटिक कॅप्शनचा पर्याय दिला आहे. या वैशिष्ट्याचा उपयोग क्रिएटर्ससुध्दा करू शकतात. ऑटोमेटिक कॅप्शन सुरुवातीला फक्त निवडक भाषांमध्ये उपलब्ध असतील, परंतु यामुळे Instagram नंतर अधिक भाषा आणि देशांमध्ये विस्तारेल.
ऑटोमेटिक कॅप्शन AI (Artificial Intelligence) ची गुणवत्ता सुधारणे अपेक्षित आहे. ऑटोमेटिक कॅप्शनच्या मदतीने, कर्णबधिर यूजर्सना व्हिडिओसाठी अधिक पर्याय उपलब्ध असतील. त्याच वेळी, क्रिएटर्ससुध्दा हे व्यवस्थित वापरता येईल. यासोबतच ज्या लोकांना आवाज बंद करून व्हिडिओ पाहणे आवडते त्यांनाही हे मदत करेल.
क्रिएटर्ससुध्दा वापरतील हा पर्याय
शिवाय, आता व्हिडिओमध्ये काय बोलले जात आहे हे समजण्यासाठी यूजर्संना व्हॉल्यूम वाढवावा लागणार नाही. आता IGTV पेक्षा व्हिडिओ मुख्य (Instagram ) अॅपवर ठेवण्यावर लक्ष केंद्रित करणार असल्याचेही Instagram ने सांगितले. ते रील्स तयार करून क्रिएटर्सच्या कमाईचे मार्ग शोधत आहेत. आता (Instagram) वर्षाच्या शेवटी नवीन जाहिरात चाचणी सुरू करेल. त्यामुळे क्रिएटर्सना रीलवर प्रदर्शित केलेल्या जाहिरातींमधून उत्पन्न मिळवता येईल.
हेही वाचा - META Disbands 300 Persons : मेटाने हायब्रीड VR AR काम करणाऱ्या ओएसची टीम हलवली