लंडन - जागतिक हवामान बदलामुळे जगभरातील अनेक शहरांमध्ये अतिवृष्टीसह पुराचा धोका वाढणार आहे. हा इशारा जगभरातील विविध विद्यापीठांमध्ये असलेल्या संशोधकांनी दिला आहे.
न्यूकॅस्टल ऑस्ट्रेलिया, युनिव्हर्सिटी ऑफ इस्ट अँग्लिया, टिनडॉल सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च आणि इन्स्टिट्यूटो नॅसिनल दी प्रेक्वीसास एसपेसियेस (आयएनपीई), साओ पाऊलो या संस्थांमधील संशोधकांनी १७० संशोधन पत्रिकांचे विश्लेषण केले आहे. या पत्रिकांच्या विश्लेषणानंतर संशोधकांनी जगभरातील अनेक लहान आणि शहरी भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आणि पायाभूत सुविधांवर परिणाम होणार असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
हेही वाचा-फायझरची लस भारतातील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवर कमी परिणामकारक
दैनंदिन होणाऱ्या अतिवृष्टीचे प्रमाण वाढ-
संशोधकांचे निष्कर्ष हे सायन्सब्रीफ रिव्हिव्यूवमध्ये प्रकाशित झाले आहेत. या संशोधनानुसार जगभरातील अनेक लहान आणि मध्यम शहरांमध्ये अतिवृष्टीचा धोका आणि पुराचे प्रमाण वाढले आहे. जगभरात दैनंदिन होणाऱ्या अतिवृष्टीचे प्रमाण हे २० व्या शतकाच्या आणि २१ व्या शतकाच्या प्रारंभीच्या तुलनेत वाढले आहे. जागतिक हवामान बदलाने काही भागांमध्ये कमी काळात होणाऱ्या अतिवृष्टीचे प्रमाण वाढले आहे.
हेही वाचा-अफगाणिस्तानमध्ये मृत्यूचे तांडव; दोन दिवसात १००हून अधिक जवान ठार
जागतिक हवामान बदलाचा वादळांवर परिणाम-
गेल्या काही दशकांमध्ये शहरी भागांना पुराचा धोका वाढल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. नदीपात्रासारख्या ठिकाणी अतिक्रमण अशा विविध कारणांनी धोका वाढल्याचेही अभ्यासात म्हटले आहे. जागतिक हवामान बदल म्हणजे वातावरण हे अधिक प्रमाणात दमटपणा ठेवू शकतो. त्याचा वादळांवर परिणाम होऊ शकतो. अतिवृष्टीचे प्रमाण वाढल्याने काही प्रदेशांमध्ये पुराचे प्रमाण वाढू शकते, असे न्यूकॅस्टल स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे स्टीफन ब्लेकिनसॉप यांनी सांगितले.
जरी जागतिक हवामान बदलावर मर्यादित कृती करण्यात आली आहे. त्याचा अतिवृष्टी आणि पुरावर काय परिणाम होतो, हे पाहण्याची गरजही स्टीफन यांनी व्यक्त केली आहे.