टेक डेस्क - सॅमसंगच्या आगामी व्हायरलेस गॅलेक्सी बड्स प्रो डिव्हाईसची किंमत 199 डॉलर सांगण्यात येत आहे. भारतीय मुद्रेनुसार ही किंमत 14634.92 रुपये आहे. माध्यमांनी दिलेल्या अहवालांनुसार हे अॅपलचे एअर पॉड्स प्रोच्या तुलनेत 3677.12 रुपयांनी स्वस्त आहेत.
जानेवारीत सॅमसंग गॅलेक्सी एस 21 सीरीजच्या लाँच इव्हेंटमध्ये गॅलेक्सी बड्स प्रो डिव्हाईसचे अनावरण करण्यात येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. वॉकिंग कॅटद्वारे ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या स्लाईड्सनुसार, गॅलेक्सी बड्स प्रोची किंमत लाँच करताना 199 डॉलर असण्याची शक्यता आहे.
बड्स प्रोमध्ये आयपीएक्स7 फिचर असणार आहे. यामुळे धूळ व पाण्यापासून बचाव होणार आहे. यामध्ये 8 तासापर्यंतचा लिसनिंग टाईम आहे. चार्जिंग केसच्या सहाय्याने ही अवधि 28 तासांपर्यंत वाढवता येऊ शकणार आहे.
यापूर्वीच्या मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता, की गॅलक्सी बड्स प्रोचे फिचर्स, एअर पॉड्स मॅक्स आणि एअर पॉड्स प्रोमध्ये उपलब्ध असलेल्या स्पेशल ऑडिओ फंक्शनसारखेच असणार आहेत.