हैदराबाद : ट्विटर खात्यावरील ब्लू टिक हटवण्याबाबत एलन मस्क यांनी मोठी घोषणा केली होती. एक एप्रिलपासून ट्विटर खात्यावरुन ब्लू टिक हटवण्यात येणार होते. मात्र त्यानंतर एलन मस्क यांनी ट्विट करत 20 एप्रिलपासून ट्विटर खात्यावरुन ब्लू टिक हटवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे एलन मस्क यांनी दिलेली मुदत आजपासून संपली आहे. त्यामुळे आजपासून ट्विटर खात्यावरुन ब्लू टिक हटवण्यात येणार आहे.
आजपासून हटवण्यात येणार ब्लू टिक : ट्विटरची मालकी घेतल्यानंतर एलन मस्क यांनी ट्विटरमध्ये अनेक बदल केले होते. त्यानंतर त्यांनी ट्विरच्या ब्लू टिक वापरकर्त्यांना मोठा झटका दिला होता. त्यांनी ब्लू टिकसाठी यापुढे वापरकर्त्यांना पैसे मोजावे लागणार असल्याची घोषणा केल्याने अनेक वापरकर्त्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली होती. मात्र ब्लू टिक हवे असल्यास पैसे मोजावे लागतील, यावर एलन मस्क ठाम राहिले. त्यांनी अगोर एक एप्रिलपासून ब्लू टिक मार्क काढून टाकण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांनी 12 एप्रिलला एक ट्विट करत 20 एप्रिलपासून ट्विटरच्या वापरकर्त्यांच्या खात्यावरुन ब्लू टिक मार्क काढून टाकण्याची घोषणा केली होती.
किती मोजावे लागतील पैसे : एलन मस्क यांनी ट्विटरच्या ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी आपल्याला किती पैसे मोजावे लागणार याची पडताळणी सुरू केली आहे. मात्र ट्विटरने याबाबत वेगवेगळी रक्कम आकारली आहे. यात अमेरिकेत आयओएस किंवा अँड्रॉईड वापरकर्त्यांना एका महिन्यासाठी 11 डॉलर मोजावे लागणार आहेत. तर एका वर्षासाठी 114.99 डॉलर मोजावे लागणार आहेत. वेबवर ट्विटर ब्लू टिक मार्क सेवा हवी असल्यास अमेरिकेत प्रतिमहिना 8 डॉलर आणि वर्षासाठी 84 डॉलर भरावे लागणार आहेत.
पैसे मोजले नाही, तर हटणार ब्लू टिक : सध्या ट्विटरवर अनेक वापरकर्त्यांना ब्लू टिक मार्कची सेवा दिली होती. मात्र एलन मस्क यांच्या नवीन धोरणानुसार या वापरकर्त्यांना ब्लू टिक सेवेचा आज शेवटचा दिवस असेल. उद्यापासून या वापरकर्त्यांनी पैसे मोजले नसल्यास त्यांची ब्लू टिक सेवा खंडीत करण्यात येणार असल्याचे ट्विटरच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा - Twitter Introduces 10K Character Tweets : सबस्टॅकला धक्का, ट्विटरने 10K शब्दांची ट्विट सुविधा केली सादर