बरेली : विविध आजारांवर गोमूत्र मोठे चमत्कारिक असल्याचा दावा अनेक बुवा आणि बाबांकडून करण्यात येतो. त्यामुळे गोमूत्राची मोठी विक्री खुलेआमपणे बाजारात करण्यात येते. मात्र गोमूत्र मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा दावा बरेली येथील भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्था (IVRI) या देशातील प्रमुख प्राणी संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. यावेळी या संशोधकांनी म्हशीचे मूत्र विशिष्ट जीवाणूंवर अधिक प्रभावी होत असल्याचेही या संशोधनात नमूद केले आहे.
गोमूत्रात 14 प्रकारचे हानिकारक जीवाणू : गोमूत्रांमध्ये विविध प्रकारच्या आजारांना दूर करण्याची क्षमता असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात येतो. मात्र निरोगी गाई आणि बैलांच्या मूत्रांच्या नमुन्यांमध्ये कमीतकमी 14 प्रकारचे हानिकारक जीवाणू एस्चेरिचिया कोलाय असल्याचे भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेचे संशोधक भोजराज सिंह आणि त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळे पोटात संसर्ग होऊ शकतो असा दावाही या संशोधकांनी केला आहे. या संशोधनाचे निष्कर्ष रिसर्चगेट या ऑनलाइन संशोधन वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आले आहेत.
म्हशीचे मूत्र बॅक्टेरियावर आहे परिणामकारक : भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनात काही खळबळजनक दावे केले आहेत. गोमूत्रात विविध आजारांवर परिणामकारक असलेल्या घटक असल्याचा दावा या संशोधकांनी नाकारला आहे. त्याउलट म्हशीच्या मूत्रात विषाणूवर परिणामकारक असलेले घटक असल्याचा दावा या संशोदकांनी केला आहे. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या एपिडेमियोलॉजी विभागाचे प्रमुख असलेले सिंग गाई, म्हशी आणि मानवांच्या 73 मूत्र नमुन्यांचे सांख्यिकीय विश्लेषण केले. यातून म्हशीच्या मूत्रातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गायींच्या तुलनेत अधिक चांगला आहे. म्हशीचे मूत्र बॅक्टेरियावर लक्षणीय परिणामकारक असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
गोमूत्र जीवाणूविरोधी असल्याचा समज : या संशोधकांनी डेअरी फार्ममधून साहिवाल, थारपारकर आणि विंदावणी या तीन प्रकारच्या गायींच्या गोमूत्रांचे नमुने गोळा केले. यावेळी त्यांनी म्हशी आणि मानवांच्या मूत्राचे नमुनेही अभ्यासले. जून ते नोव्हेंबर 2022 दरम्यान केलेल्या या संशोधनात निरोगी व्यक्तींच्या लघवीच्या नमुन्यांमध्ये संभाव्य रोगजनक बॅक्टेरिया असतात असा दावा या संशोधकांनी केला आहे. बॅक्टेरियाच्या निवडक गटासाठी प्रतिबंधक असू शकतात. परंतु गोमूत्र हे जीवाणूविरोधी आहे, असा सामान्य समज मान्य केला जाऊ शकत नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. डिस्टिल्ड युरीनमध्ये संसर्गजन्य जीवाणू नसतात, असा दावा करण्यात येतो. मात्र आम्ही यावर पुढील संशोधन करत असल्याचेही या संशोधकांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - New Frog Species Found : मेघालयाच्या गुहेत आढळली बेडकाची नवीन प्रजाती