ETV Bharat / science-and-technology

Gene Edited Babies : गर्भाच्या जनुकांमध्ये 'बदल' करणाऱ्या चिनी शास्त्रज्ञाने सांगितले की, आता 'ती' मुले कशी आहेत - चिनी शास्त्रज्ञ हे जियानकुई

जगातील पहिली 'जीन एडिटेड बेबी' ( Gene edited babies ) तयार करणाऱ्या चिनी शास्त्रज्ञाने खुलासा केला आहे की, 'वयाच्या १८ वर्षानंतर मुले त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी वैद्यकीय पाठपुरावा करायचा की नाही हे ठरवतील. एका मुलाखतीत हे जियानकुई ( He Jiankui ) म्हणाले की, त्यांचे जीवन सामान्य आणि शांत आहे. हे जियानकुई यांनी जीन एडिटेड तीन बाळं तयार केली होती, त्यांच्या संदर्भात ते बोलत होते.

IVF News
जीन एडिटेड बेबी
author img

By

Published : Feb 8, 2023, 5:49 PM IST

हाँगकाँग : आज विज्ञानाने प्रत्येक क्षेत्रात प्रचंड प्रगती केली आहे. याचेच एक उदाहरण आज आपण बघत आहोत. जगातील पहिली 'जीन एडिटेड बाळं' तयार करणाऱ्या आणि 2018 आणि 2019 मध्ये तीन वर्षांचा तुरुंगवास भोगलेल्या वादग्रस्त चिनी शास्त्रज्ञाने, जनुकीयरित्या बदल करुन तयार केलेले बाळ त्यांच्या पालकांसोबत आनंदाने जगत आहे, असे बोलून दाखवले. एका मुलाखतीत हे जियानकुई म्हणाले की, त्या बाळांचे जीवन सामान्य, शांत आणि सुरक्षित आहे.

IVF News
चिनी शास्त्रज्ञ हे जियानकुई

जनुक-संपादन : आणि त्यांचे जीवन सामान्य, शांत आणि सुरक्षित राहावे 'हीच त्यांची इच्छा आहे आणि आपण त्यांचा आदर केला पाहिजे,' असे त्यांनी अहवालात नमूद केले आहे. मुलं आणि त्यांच्या कुटुंबियांचा आनंद ही सगळ्यात प्राथमिक बाब आहे. ते मुलांच्या भवितव्याबद्दल चिंतित आहे का? असे विचारले असता, शास्त्रज्ञ म्हणाले की, 'त्यांच्याबद्दल खूप अपेक्षा आणि चिंता दोन्ही आहे.' डिसेंबर 2019 मध्ये, एका चीनी न्यायालयाने हे जियानकुईला 'CRISPR-Cas9' नावाचे जनुक-एडिटेड साधन वापरून वैद्यकीय नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

जुळ्या मुली तयार केल्या : 2018 मध्ये, जियानकुईने जगाला धक्का दिला जेव्हा त्याने घोषित केले की, त्यांनी लुलु आणि नाना नावाच्या दोन अनुवांशिकरित्या सुधारित जुळ्या मुली तयार केल्या आहेत. तिसरे मूल, एमीचा जन्म देखील झाला आणि आता तो देखील चीनमध्येच आहे. त्यांनी CCR5 जनुक पुन्हा लिहिण्यासाठी CRISPR Cas9 हे जनुक एडिटेड साधन वापरले, एक अनुवांशिक उत्परिवर्तन जे HIV ला प्रतिकार करण्यासाठी ओळखले जाते.

ऑक्सफर्ड विद्यापीठात : 'वयाच्या १८ वर्षांनंतर, मुले त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी वैद्यकीय पाठपुरावा करायचा की नाही हे ठरवतील. परंतु आम्ही आयुष्यभर हे करण्यासाठी वचनबद्ध आहोत,' असे शास्त्रज्ञाने प्रकाशनाला सांगितले. हे जियानकुई यांना आता एक चॅरिटेबल फाऊंडेशन स्थापन करायचे आहे आणि तिन्ही मुलांचा वैद्यकीय खर्च भागवायचा आहे. पुनरुत्पादक औषधांमध्ये CRISPR जनुक-संपादन तंत्रज्ञानाच्या वापराविषयी बोलण्यासाठी पुढील महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठाला भेट देण्यास या शास्त्रज्ञाला आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांनी बीजिंगमध्ये स्वस्त जीन थेरपीवर काम करण्यासाठी नवीन प्रयोगशाळा स्थापन केली आहे. 2018 च्या उत्तरार्धात सात भ्रूणांवर केलेल्या त्याच्या प्रयोगांनी वैद्यकीय आणि वैज्ञानिक जगाला धक्का दिला होता.

हेही वाचा : First synthetic embryos प्रथम कृत्रिम भ्रूण वैज्ञानिक प्रगती गंभीर नैतिक प्रश्न निर्माण करते

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.