ETV Bharat / science-and-technology

world environment day पेट्रोल डिझेलला बाय-बाय, आता बॅटरीवर चालणाऱ्या सायकलला करा 'हाय' - ईलेक्ट्रानिक सायक

बॅटरीवर चालणाऱ्या सायकलमध्ये लिथेमन बॅटरीचा वापर केला जातो. ही बॅटरी सायकलपासून वेगळी देखील करण्यात येते. त्यामुळे आपण ही बॅटर घरी देखील चार्ज करू शकतो. (world environment day) ही बॅटरी चार्ज करण्यासाठी साधारण तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतोय. तीन तासात ही बॅटरी 80 टक्के चार्ज. तसेच उरलेल्या अर्ध्या तासात बॅटरी 100 टक्के चार्ज होते.

Mumbai made battery powered bicycle
मुंबई बनवली बॅटरीवर चालणारी सायकल
author img

By

Published : Jun 5, 2021, 7:58 AM IST

Updated : Jun 5, 2021, 12:44 PM IST

मुंबई - पेट्रोलच्या दराने सेंचुरी पार केली आहे. पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर सामान्यांच्या खिशाला आता परवडेना झाले आहेत. यावर उपाय म्हणून मुंबईतल्या तरुणांनी पुढे येत एक सायकल बनवली आहे. मुळात ही सायकल बॅटरीवर चालणारी असल्याने ती सायकल सगळ्यांसाठीच एक आकर्षणाचा विषय ठरली आहे. पर्यावरणपूरक (world environment day) असणारी ही सायकल बाजारात उपलब्ध झाल्यास याचा फायदा सर्वसामान्यांना होणार आहे. पर्यावरण दिनाच्या निमित्ताने मुंबईतील तरुणांनी बनवलेल्या या इलेक्ट्रॉनिक सायकलबाबतचे ईटीव्ही भारतने केलेले विशेष वृत्त..

मुंबईत बनवली बॅटरीवर चालणारी सायकल

बॅटरीवर चालणारी सायकल आणि तिचे वैशिष्ट्य -

मुळात मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद किंवा मग देशातली अन्य शहरे या ठिकाणी लोक मोठ्या प्रमाणावर बाईक वापरत असतात. तसेच डिलिव्हरी पोहोचवण्यासाठी डिलिव्हरी बॉय बाईकचा वापर करत असतात. बाईक एका किलोमीटरला इंधनखर्चापोटी तीन ते चार रुपये मोजावे लागतात. मात्र बॅटरीवर चालणारी सायकल फक्त 20 पैसे प्रति किलोमीटर इतके मायलेज देणारी आहे. त्यामुळे नक्कीच हे फायद्याचे ठरणार आहे.

बॅटरीची क्षमता किती? -

बॅटरीवर चालणाऱ्या सायकलमध्ये लिथेमन बॅटरीचा वापर केला जातो. ही बॅटरी सायकलपासून वेगळी देखील करण्यात येते. त्यामुळे आपण ही बॅटर घरी देखील चार्ज करू शकतो. ही बॅटरी चार्ज करण्यासाठी साधारण तीन ते साडेतीन तासांचा वेळ लागतोय. तीन तासात ही बॅटरी 80 टक्के चार्ज. तसेच उरलेल्या अर्ध्या तासात बॅटरी 100 टक्के चार्ज होते. बॅटरी एकदा चार्ज केली की वीस किलोमीटर पर्यंत ही सायकल चालू शकते तसेच पायडल मारत ही सायकल 40 किलोमीटर पर्यंत चालू शकते असे सायकल बनवणारे विकास गुप्ता सांगितले.

सायकलची किंमत किती?-

ही सायकल मुंबईच्या व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनवली आहे. ही सायकल बनवण्यासाठी साधारण 22 हजार रुपयांचा खर्च झाला आहे. तसेच मार्केटमध्ये ही सायकल उपलब्ध झाल्यास याची किंमत सत्तावीस हजारापर्यंत असू शकते असे विकास गुप्ता सांगतात. मात्र या सायकलची किंमत भविष्यात कमी देखील होऊ शकते असेही ते म्हणाले. सध्या बॅटरीवर चालणाऱ्या 10 सायकल बनवल्या आहेत. टेस्टिंग राज्यातल्या विविध भागात केले जाणार आहे, असेही विकास गुप्ता म्हणाले.

हेही वाचा - ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी सोशल मीडियावर मागितली मदत; तीन तासांत जमा झाले 37 लाख

Last Updated : Jun 5, 2021, 12:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.