नवी दिल्ली: तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲपलने भारतात आयफोन 13 चे उत्पादन सुरू ( iPhone 13 Production Starts in India ) केले आहे. ज्यामुळे भारताचे उत्पादन महासत्ता म्हणून उदयास येण्याच्या स्वप्नाला बळ मिळाले आहे. सूत्रांनी सांगितले की, आयफोन 13 चेन्नईजवळील ॲपलच्या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर फॉक्सकॉनच्या ( Contract manufacturing partner Foxconn ) प्लांटमध्ये तयार केला जात आहे.
ॲपलने एका निवेदनात म्हटले आहे की, “आम्ही आयफोन 13 चे उत्पादन सुरू करण्यास उत्सुक आहोत. त्याच्या मोहक डिझाइनसह, उत्तम फोटो आणि व्हिडिओंसाठी प्रगत कॅमेरा प्रणाली आणि A15 बायोनिक चिपची अविश्वसनीय कामगिरी सोबत आमच्या स्थानिक ग्राहकांसाठी ते भारतात तयार केले जात आहे.
उल्लेखनीय म्हणजे ॲपलने 2017 मध्ये आयफोन एसई ( iPhone SE ) सह भारतात आयफोन ( iPhones ) निर्मितीला सुरुवात केली होती. कंपनी सध्या भारतात आयफोन 11 ( iPhone 11 ), आयफोन 12 ( iPhone 12 ) आणि आता आयफोन 13 ( iPhone 13 ) सह काही प्रगत आयफोन बनवते. आयफोन 13 ( iPhone 13 )आधुनिक 5G अनुभव, A15 बायोनिक चिप, दीर्घ बॅटरी आयुष्य आणि आकर्षक डिझाइनसह येतो. ॲपलचा भारतात प्रवास सुमारे 20 वर्षांपूर्वी सुरू झाला. ॲपलने सप्टेंबर 2020 मध्ये त्यांचे ऑनलाइन स्टोअर लाँच केले होते, आणि कंपनीने देशात व्यवसाय वाढवण्याची वचनबद्धता व्यक्त केली आहे.
हेही वाचा - Spotify New feature : आता स्पॉटिफायवर आणखी प्लेलिस्ट उपलब्ध होणार, जाणून घ्या हे फीचर कसे आणि कोणाला मिळणार