सॅन फ्रान्सिस्को: वर्ष 2021 मध्ये ॲपलने आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन, आयफोनची नवीन सीरीज, आयफोन 13 लॉन्च केली होती. जे लोकांना खुप पसंद आले होते. नुकतेच आयफोन 13 च्या वापरकर्त्यांना आपल्या फोनमध्ये एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे त्यांच्या फोनच्या स्क्रीनचा रंग अचानकपणे गुलाबी आणि जांभळा होत आहे. यामुळे नाराज झालेल्या वापरकर्यांनी ॲपल कंपनीकडे (Users complain to Apple) याबाबत तक्रार केली आहे.
ॲपल इंसाइडरच्या रिपोर्टनुसार (Apple Insider's report), नुकतेच आयफोन 13च्या बऱ्याच वापरकर्त्यांना आपल्या फोनच्या स्क्रीनवर एका वेगळ्याच अडचणीचा सामना करावा लागत आहे. ज्यामुळे त्यांच्या फोनच्या स्क्रीनचा रंग अचाणकपणे गुलाबी आणि जांभळा होत आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आयफोन लॉक झाल्यानंतर गुलाबी रंगाची स्क्रीन दिसते.
रिपोर्टनुसार, याच्यामध्ये अशी काय गोष्ट आहे, ज्यामुळे वापरकर्त्यांना समस्या येत आहे. परंतु ही समस्या व्यवस्थित होऊ शकते. काही वापरकर्त्यांच्या माहितीनुसार आयफोनच्या सेटिंग्सला रीसेट केल्याने ही समस्या मिटत आहे. त्याचबरोबर काही लोकांचे म्हणने आहे की,ॲपलशी संपर्क केला आणि त्यांनी आपला हॅंडसेट बदलून दूसरा घेतला आहे. मॉयड्रॉइवर्सच्या रिपोर्टनुसार, चीनचे यूजर्स फोनच्या या समस्येने त्रस्त (Chinese users suffer from problems) आहेत. आता अशी माहिती मिळते की, ॲपलला या समस्येबद्दल अगोदर पासून माहिती आहे.
ग्राहक सेवा प्रतिनिधीने एका ग्राहकाला सांगितले की, टीमला संबंधित सूचना प्राप्त झाली नाही की ही हार्डवेअर समस्या आहे. परंतु त्यांनी सांगितले की ही एक सिस्टम समस्या आहे. वापरकर्त्यांना त्यांच्या डेटाचा बॅकअप घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि नंतर फॅक्टरी रीसेट करा किंवा नवीनतम आवृत्तीवर आयओएस अपडेट करा. समस्या अजूनही कायम राहिल्यास, हार्डवेअर दुरुस्तीची आवश्यकता असू शकते.