हैदराबाद - स्वातंत्र्य, समानता आणि स्वशासन या मूलभूत तत्त्वांवर आधारित, जगातील सर्वात जुनी लोकशाही अशी ओळख असलेल्या अमेरिकन लोकशाही राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मात्र चांगलीच गडबडली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या ४६ व्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बिडेन ८ कोटी मतांच्या फरकाने जिंकले. मात्र, व्हाईट हाऊसचा ताबा असलेले सध्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्वीकारण्यास नकार दिल्याने अनिश्चितता पसरली होती. इलेक्टोरल मतांमधून बिडेनला ३०६ मते मिळाल्याने ट्रम्प यांच्या उत्सुकतेचा अंत झाला.
विजय नोंदविल्यानंतर ट्विटद्वारे भावना व्यक्त करताना बिडेन म्हणाले की “अमेरिकेत राजकारणी सत्ता घेत नाहीत - लोक त्यांना ते देतात. फार पूर्वी या देशात लोकशाहीची ज्योत पेटली होती आणि आम्हाला माहित आहे की साथीचा रोग असो किंवा कोणत्याही शक्तीचा गैरवापर ही ज्योत विझवू शकत नाही.”
लोकांमध्ये फूट पाडण्याच्या स्पर्धेपासून परावृत्त होण्याचे आवाहन त्यांनी अमेरिकन नागरिकांना केले आणि राष्ट्रीय ऐक्य करण्याचे आवाहन केले. कोविड विरुद्ध व्यापक लसीकरण, गरिबांना आर्थिक पाठबळ आणि अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन या गोष्टींना प्राधान्य असल्याचे बिडेन यांनी घोषित केले आहे.
निवडणुकीच्या धावपळीत ट्रम्प यांनी शरीराच्या रंगावरून अमेरिकन समाजात फूट पाडण्याचा जोरदार प्रयत्न केला. पराभवातही त्यांना मिळालेल्या मतांच्या विक्रमी संख्येवरून हे स्पष्ट होते. वॉशिंग्टनमध्ये अमेरिकन नागरिकांमध्ये झालेल्या रस्त्यावरील झटापटीला 'बिडेन यांनी चोरीने विजय मिळविला आहे' हे ट्रम्प यांनी केलेले वक्तव्य कारणीभूत होते. निवडणुकीत कोणतीही अनियमितता झाली नाही, असे सांगणार्या अधिकाऱ्यांना शिव्या देत अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने वर्तन केले ते अभूतपूर्व होते. त्यांनी केवळ न्यायपालिकेवर टीका केली नाही तर ज्यांनी आपली बाजू घेण्यास नकार दिला अशा व्यक्तींना मुख्य पदांवरुन काढून टाकले. त्यांची वागणूक ही कोविड साथीच्या रोगापेक्षा देखील धोकादायक होती.
मिशिगनमधील १६ मते बदलण्याचा प्रयत्न करून निवडणूक उलथून टाकण्याचा ट्रम्प यांनी प्रयत्न केला. ट्रम्प यांच्यासाठी निकाल बदलण्यास नकार देताना मिशिगन येथील रिपब्लिकन सभागृहाचे अध्यक्ष ली चॅटफिल्ड म्हणाले, “ट्रम्प यांच्यासाठी मतदारांचे ठराव मंजूर करण्यासाठी आम्ही आमच्या निकष, परंपरा आणि संस्था धोक्यात आणू शकत नाही.” अनियमिततेला परवानगी दिली तर देश कायमचा गमावण्याची भीती सभापतींनी व्यक्त केली. ट्रम्प यांनी देशातील संस्थांचे स्वातंत्र्य किती धोक्यात आणले आहे हे त्यांच्या शब्दांवरून लक्षात येते.
ट्रम्प यांना पुन्हा निवडून देणे हा जगासमोर असलेला सर्वात गंभीर धोका असू शकतो असे चार वर्षांपूर्वी 'इकॉनॉमिस्टने' केलेल्या सर्वेक्षणात म्हटले होते. ट्रम्प यांनी गेल्या चार वर्षात त्यांना चुकीचे सिद्ध करण्यासाठी कोणतीही कसर सोडली नाही. अध्यक्षीय उद्घाटनाच्या कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले होते की “या दिवसापासून एका नवीन दृष्टीने शासन करेल. ज्यामध्ये 'अमेरिका फर्स्ट'ला प्राधान्य असणार आहे.” परंतु त्यांनी सर्व लोकशाही मूल्ये पायदळी तुडवत स्वतःचा अभिमान जोपासला. आपल्या एककल्ली आणि मनाला येईल ते करण्याच्या वृत्तीमुळे त्यांनी अमेरिकेला राष्ट्रांच्या समूहापासून अलिप्त केले. ट्रम्प यांनी पॅरिस करार आणि इराणबरोबर झालेल्या अणु करारापासून एकतर्फी माघार घेतली होती. त्यांनी ट्रान्स-अटलांटिक अलायन्स आणि जागतिक आरोग्य संघटना देखील सोडली. त्यांनी चीनशी व्यावसायिक संघर्ष करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे अनेक राष्ट्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला.
प्रत्येक टप्प्यावर ट्रम्प यांनी निवडणुकीनंतर सत्ता हस्तांतरणासाठी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. २०२४ च्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाग घेणार असल्याचे ट्रम्प सांगत आहेत. भारतीय वंशाच्या असलेल्या कमला हॅरिसची निवड करुन बायडेन यांनी विजयी खेळी केली. डोनाल्ड ट्रम्प यांनी राबवलेल्या निरंकुश सत्तेमुळे सपाट झालेल्या अमेरिकन राजकारणाच्या सभ्यतेची इमारत आता त्यांना परत दुरुस्त करावी लागेल. तर, दुसरीकडे अमेरिकेला पुन्हा एकत्र आणणे हे बिडेन-हॅरिस यांच्यासाठी पहिले आव्हान आहे.