ETV Bharat / opinion

कोरोनामुळे दररोज पाच वर्षांखालील हजारो मुलांचा मृत्यू होण्याचा धोका : युनिसेफ - युनिसेफ कोरोना बालमृत्यू

कोरोना विषाणूचा उद्रेक होऊन पाच महिने होत असताना निर्माण झालेली आरोग्य समस्या आता बालकांच्या हक्कांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे युनिसेफने म्हटले आहे. तसेच यावर त्वरित कृती न केल्यास पाच वर्षांखालील मुलांच्या जीविताला धोका निर्माण होऊन प्रतिदिन ६ हजारांपेक्षा देखील जास्त मुलांचे मृत्यू होऊ शकतात.

COVID-19: Over 6,000 additional children under five could die everyday warns UNICEF
कोविड १९ मुळे प्रतिदिन ६ हजारांपेक्षा जास्त पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचा धोका : युनिसेफ
author img

By

Published : May 14, 2020, 11:42 PM IST

हैदराबाद - जग कोरोना विषाणूच्या संकटाने ग्रस्त असताना आरोग्य यंत्रणा कमकुवत आणि विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिल्यास ज्या रोगांपासून बचाव करता येणे शक्य आहे त्यावर नियंत्रण मिळविणे अशक्य होईल. परिणामी पुढील सहा महिन्यात प्रतिदिन ६ हजारांपेक्षा जास्त मुलांचे मृत्यू होऊ शकतात असा इशारा द युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंडाने (युनिसेफ) दिला आहे. जॉन्स हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील संशोधकांनी केलेल्या विश्लेषणावर आधारित मुलांचे मृत्यू होऊ शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती लॅन्सेट ग्लोबल हेल्थ जर्नलमध्ये बुधवारी प्रकाशित करण्यात आली आहे.

जगभरातील कमी-मध्यम-उत्पन्न-असलेल्या ११८ प्रदेशांतील तीन महत्वपूर्ण गोष्टी विचारात घेऊन हे मूल्यमापन करण्यात आले आहे. त्या आधारे मुलांच्या सुदृढतेसाठी आवश्यक सेवांमध्ये खंड पडल्याने आणि दुसरीकडे नवजात मुलांच्या जन्माचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन पाच वर्षांखालील १२ लाखांपेक्षा जास्त मुलांचे जीव धोक्यात असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोविड-१९ मुळे लहान मुलांच्या हक्कावर आपत्ती आली आहे असे युनिसेफ कॅनडाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड मॉर्ले यांनी म्हटले आहे. लहान मुले कोविड १९ मुळे आजारी पडण्याची शक्यता फारच कमी असते मात्र तसा छुपा धोका संभवतो. त्यामुळे मुलांचे लहानपण कोरोना साथीमुळे लघु आणि दीर्घकालीन पातळीवर प्रभावित झाले आहे.

मागील दशकभरातील सातत्यशील प्रयत्नांमुळे पाच वर्षांखालील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यात जे यश मिळविले आहे त्याला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या अगोदर देखील या ११८ प्रदेशातील पाच वर्षांखालील मृत्यूचे प्रमाण मोठे आहे. त्यामुळे कोविड १९ मुळे होणारे मृत्यू आणि स्थानिक पातळीवरील बाल हक्कांची पूर्तता न झाल्यामुळे होणारे मृत्यू मिळून हा आकडा २५ लाखांपर्यंत जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

अतिशय वाईट परिस्थिती ओढवल्यास, मागील अनेक वर्षात पहिल्यांदाच पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढू शकते असे युनिसेफचे शासकीय संचालक हेनरीटा फोर यांनी म्हटले आहे. "कोरोनाशी संघर्ष करत असताना आपण माता व नवजात बालकांना धोका निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आपल्याला माता आणि बालकांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यात यश मिळाले आहे, त्याला धोका निर्माण होऊ नये," असे फोर म्हणाले.

युनिसेफने निदर्शनास आणून दिले की बर्‍याच प्रकरणांमध्ये निर्वासित, स्थलांतरित आणि अंतर्गत विस्थापित मुलांविषयी वाढत असलेल्या झेनोफोबिया (द्वेष भावना) आणि भेदभाव यामुळे मुलांना आवश्यक त्या सोयीसुविधा आणि संरक्षण मिळत नाही. त्यातच हालचालींवर आलेल्या मर्यादा, शाळा बंद होणे आणि अलिप्तपणामुळे तणावाखाली असलेल्या मुलांवर अतिरिक्त ताण येऊ शॉट. परिणामी त्यांचे मानसिक आरोग्य बिघडून त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होईल असे युनिसेफने स्पष्ट केले.

दरम्यान मुले, महिला आणि असुरक्षित लोकांना या परिणामांपासून दूर ठेवण्यासाठी चांगला आहार, आरोग्य, पाणी, पोषण, स्वच्छता, शिक्षण आणि संरक्षण मिळेल याकडे युनिसेफने लक्ष केंद्रित केले आहे. कोरोना प्रादुर्भावाविरोधात लढण्यासाठी युनिसेफला आतापर्यंत २५० लाख डॉलर्सची मदत मिळाली आहे. तसेच या निधीत वाढ झाल्यास युनिसेफने याअगोदर साध्य केलेल्या उद्दिष्टांना टिकविण्यात यश येईल.

युनिसेफने आतापर्यंत १ अब्ज ६७ लाख लोकांपर्यंत संदेशाच्या माध्यमातून कोविड १९चा प्रतिबंधक करण्यासाठी हाताची स्वछता, खोकला आणि शिंका आल्यावर घ्यावयाची काळजी यांसारख्या विषयांवर जागरूकता निर्माण केली आहे. १२ लाख लोकांपर्यंत पाणी, स्वच्छता आणि स्वच्छता उत्पादनांचा पुरवठा केला आहे. तर डिस्टन्स लर्निंग किंवा होम -बेस्ड शिक्षणाच्या माध्यमातून 80 लाख मुलांशी संपर्क केला आहे. त्याचबरोबर ५२ देशांमध्ये, ६६ लाखांपेक्षा जास्त हातमोजे (ग्लोव्ह्ज), १३ लाख सर्जिकल मास्क, ४ लाख २८ हजार N-95 रेस्पिरेटर्स आणि ३४ हजार ५०० कोविड १९ टेस्टिंग किट्सचा पुरवठा केला आहे.

आवर्जून नमूद करण्यासारखे म्हणजे, आतापर्यंत तब्बल १ कोटी १ लाख महिला आणि बालकांना आवश्यक त्या आरोग्य सोयी सुविधा पुरविण्याबरोबरच ८ लाख ३० हजार मुले, पालक आणि काळजीवाहक पालकांना समुदायावर आधारित मानसिक आरोग्य आणि मनोवैज्ञानिक आधार देण्याचे काम युनिसेफने केले आहे.

हेही वाचा : कोरोनासाठी कोणकोणत्या प्रकारच्या लस विकसित केल्या जात आहेत..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.