वॉशिंग्टन : जागतिक आरोग्यसेवेचे भवितव्य घडवण्यात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भूमिकेसंदर्भात दूरगामी आढावा घेण्यात आला असून त्यात जागतिक आरोग्य समुदायाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या समन्यायी आणि नैतिक वापर सुविधाजनक व्हावे, यासाठी मानवकेंद्रित संशोधन अजेंडा विकसित करणे आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोलंबिया विद्यापीठातील मेलमन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील हेलब्रम लोकसंख्या आणि कुटुंब आरोग्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक तसेच इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ग्लोबल हेल्थच्या संयुक्त राष्ट्रसंघ विद्यापीठातील मुख्य अतिथी फेलो निना श्वालबे आणि जॉन हॉपकिन्स ब्लुमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक स्कूल येथील आंतरराष्ट्रीय आरोग्य विभागातील सहाय्यक वैज्ञानिक ब्रायन वाहल. पीएचडी यांनी हा अभ्यास आणि शिफारशी तयार केल्या आहेत. लँसेटमध्ये हा अभ्यास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.
अनेक कमी आणि मध्यम उत्पन्नाच्या देशांमध्ये माहिती तंत्रज्ञान आणि मोबाईल कम्प्युटिंग पॉवर यात झालेली प्रगती लक्षात घेता कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक आरोग्याच्या क्षेत्रात विशिष्ट आव्हानांचा सामना करताना मदत करू शकते, याबाबत आशा वाढली आहे. तसेच आरोग्य संबंधित शाश्वत विकासाची उद्दिष्टे आणि सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती साध्य करण्याचा वेग गतिमानही करण्यात तिची मदत होईल.
तरीसुद्धा, सध्याच्या घडीला विशेषतः नव्या कोरोना विषाणुला प्रतिसाद देताना डिजिटल साधने आणि प्रणाली झपाट्याने वापरली जात आहे. या संदर्भात व्यक्ति आणि समाजाला समान प्रमाणात लाभ होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता समर्थित उपाययोजनांचा काळजीपूर्वक आणि सावधानतेने उपयोग केला पाहिजे.
विशेषतः कोविड-१९ आणिबाणीच्या काळात, मानव केंद्रित रचना आणि अल्गोरिथममधील लिंगभेद यांच्या महत्वाबाबत आम्हाला जे काही माहित आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करू शकत नाहि, असे श्वालबे म्हणाले. आरोग्य प्रणालीच्या संदर्भात ज्यात त्यांचा वापर केला गेला आहे, त्या कृत्रिम बुद्धिमत्ता उपाययोजना कशा प्रकारे स्विकारता येईल, हा प्रत्येक अभ्यासाचा भाग असला पाहिजे.
या अभ्यासातून एक महत्वाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला आहे की आमच्या झपाट्याने विकसित होत चाललेल्या डिजिटल युगात ज्यात कृत्रिम बुद्धिमत्तेला असलेल्या संभाव्य प्रभावी संधींचे प्रतिबिंब पडले आहे, त्याचेवेळेस याचाही विचार करावा लागेल की ज्यांना सर्वाधिक धोका आहे त्यांच्या संरक्षणासाठी आम्ही कुठे कमी पडत आहोत-घडामोडी उत्तेजित करणार्या असल्या तरीही पुरेसा पुरावा आणि योग्य संरक्षणाशिवायच अमलात आणल्या जात आहेत, असे द लॅसेटचे वरिष्ठ कार्यकारी संपादक डॉ. नाओमी ली यांनी सांगितले.
वाहल आणि श्वालबे यांच्या अनुसार, कोविड-१९ रूग्णांना असलेल्या धोक्याचे मूल्यांकन आणि रूग्णांच्या ओघाचे व्यवस्थापन यासह कोविडला प्रतिसाद देण्याबाबत विचार करण्यासाठी उच्च स्त्रोत असलेल्या रचनेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा अगोदरच उपयोग केला जात आहे. मात्र, स्त्रोत मर्यादित असलेल्या रचनेत कोविड-१९ प्रतिसादाला कृत्रिम बुद्धिमत्ता सहाय्य करू शकते परंतु अशा परिस्थितीमध्ये तिचा योग्य उपयोगा होईल, याची खबरदारी घेण्यासाठी सध्या फारच थोड्या यंत्रणा उपलब्ध आहेत, याकडे त्यांनी दिशानिर्देश केला.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा जागतिक आरोग्याच्या संदर्भात झपाट्याने विचार केला जात असताना, आणि कोविड-१९ प्रतिसाद देण्याच्या संदर्भात, आढावा अहवालाने खालील शिफारशी केल्या आहेत.
- विकास प्रक्रियेत मानव केंद्रित रचनेच्या पैलूंचा समावेश करा, ज्यात साधन आधारित नव्हे तर गरजेवर आधारित पवित्र्याचा समावेश असेल.
- प्रातिनिधिक आकडेवारी ही त्वरित आणि समन्यायी पद्घतीने उपलब्ध होईल, याची सुनिश्चिती करा;-जागतिक आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता चालित उपायांची कार्यक्षमता आणि परिणामकारकता यांच्या मूल्यांकनासाठी जागतिक प्रणाली स्थापित करा.
- नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता चालित उपाययोजनांच्या वापरावर अमलबजावणी आणि प्रणालीशी संबंधित प्रश्नांवर संशोधन अजेंडा विकसित करा.
- एलएमआयसीच्या हिताचे रक्षण होईल अशी जागतिक नियामक, आर्थिक आणि नैतिक मानके आणि मार्गदर्शक तत्वे विकसित करून त्यांची अंमलबजावणी करा.
संशोधक, श्वालबे आणि वाहल, यांनी सहकार्यांनी समीक्षा केलेल्या साहित्याचा व्यापक आढावा घेऊन या शिफारशी विकसित केल्या आहेत. कोविड-१९ ला प्रतिसाद देताना, कृत्रिम बुद्धिमत्ता एसडीजी आणि यूएचसी साध्य करण्यात योगदान देईल तसेच एलएमआयसीमधील आरोग्याची सुधारणा करण्यास सहाय्य करण्याची सुनिश्चिती करण्यासाठी हा अभ्यास त्यांनी केला.
कोविड-१९ च्या महामारीच्या पार्श्वभूमीवर, आम्ही कधी नव्हे ते आज अत्यंत दक्ष राहून, नियामक, नैतिक आणि डेटा संरक्षण मानके लागू केली पाहिजेत. उपाययोजना मोठ्या प्रमाणावर लागू करताना त्या काम करत आहेत, हे सिद्ध करण्याच्या नैतिक आदर्षांचे पालन केले पाहिजे. याशिवाय, ज्या कमकुवत लोकसंख्येला आम्ही समर्थन देण्याचा सर्वोत्कृष्ट प्रयत्न करत आहोत, तिला असलेल्या धोक्याची पायमल्ली होईल, असे श्वालबे म्हणाल्या.
आरोग्य सुधारणा आणि वाढत्या शहरी पर्यावरणात मुले आणि तरूणांच्या कल्याणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापराचे कैवारी असलेल्या फौंडेशन बोटनार, या स्विसमधील प्रतिष्ठानने या अभ्यासाला समर्थन दिले आहे. फाऊंडेशन बोटनारचे सीईओ स्टेफान जर्मन म्हणाले की आम्ही या महत्वाच्या आणि वेळेवर आलेल्या अभ्यासाला पाठिंबा देत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. या वर्षी उत्तरार्धात डिजिटल आरोग्यावर जागतिक आरोग्य संघटना नवीन जागतिक धोरण स्विकारणार असल्याच्या अंदाजाने आणि कोविड १९ ला प्रतिसाद देताना तंत्रज्ञान झपाट्याने तैनात केले जात असताना, मानवी अधिकार मुद्यांवर तसेच डेटाचा वापर आणि त्याची देवाणघेवाण याभोवतीच्या आवश्यक प्रशासकीय रचना, जागतिक आरोग्य संघटनेची नेतृत्व पुरवण्याची संस्थांची भूमिका यावर आपण चर्चा उपस्थित करण्याची गरज आहे.