ETV Bharat / opinion

Gujrat Election 2022 : दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रात विजय मिळवणे भाजपसाठी आवश्यक

गुजरात विधानसभा निवडणुकीत (Gujrat Election 2022) पहिला टप्प्याचे मतदान १ डिसेंबरला होणार आहे. (Gujrat Election phase one). या टप्प्यात दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रमध्ये निवडणुका होणार आहेत. ही दोन्ही क्षेत्रे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. याचे कारण म्हणजे येथे काँग्रेस आणि आम आदमी पक्ष भाजपसमोरील आव्हान आहे. सौराष्ट्रात काँग्रेस परंपरागतपणे मजबूत आहे. तर सुरतच्या स्थानिक निवडणुकीत 'आप'ने ज्या प्रकारे इतर पक्षांना चकित केले आहे, त्यामुळे भाजपलाही त्यांची भीती वाटू शकते. पटेल समाजाचीही सौराष्ट्रात निर्णायक भूमिका आहे. मोरबी पूल दुर्घटनेचा निवडणुकीवर परिणाम होतो का, हेही पाहावे लागणार आहे. ज्येष्ठ पत्रकार श्याम पारेख यांचे हे विश्लेषण.

Gujrat Election 2022
Gujrat Election 2022
author img

By

Published : Nov 30, 2022, 6:21 PM IST

नवी दिल्ली : गुजरातमध्ये निवडणुका होणार असतानाच मोरबी पूल दुर्घटना घडली. भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराला या घटनेने मोठा धक्का बसला. या अपघातात 135 जणांचा मृत्यू झाला होता. मोरबी हे सौराष्ट्रातील औद्योगिक क्षेत्र आहे. मोरबी आणि आसपासच्या परिसरात पटेलांचे वर्चस्व आहे. भाजप गेल्या काही काळापासून पटेल समाजाला खूश करण्याचा प्रयत्न करत आहे. गुजरातचे विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे याच समाजातून आलेले आहेत. (Gujrat Election 2022) (Gujrat Election phase one).

पहिला टप्पा भाजपसाठी महत्त्वाचा : उद्या म्हणजेच १ डिसेंबरला राज्यात पहिल्या टप्प्याची निवडणूक होणार आहे. उद्या 182 पैकी 89 जागांवर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात ५ डिसेंबर रोजी ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. मोरबी दुर्घटना, अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर, 'आप'ची एन्ट्री या सगळ्यांचा निवडणुकीवर किती परिणाम झाला, हे 8 डिसेंबरला मतमोजणी झाल्यावरच कळेल. त्यामुळे पहिला टप्पा भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

भाजपची नजर सौराष्ट्रावर : पहिल्या टप्प्यात सौराष्ट्रात निवडणुका होत आहेत. या भागात काँग्रेस परंपरागतपणे मजबूत आहे. 2017 मध्येही काँग्रेसने येथे चांगली कामगिरी केली होती. काँग्रेसने येथे 48 पैकी 28 जागा जिंकल्या होत्या. 2012 च्या तुलनेत काँग्रेसला येथे 13 जागा अधिक मिळाल्या होत्या. तेव्हा काँग्रेसला येथे केवळ 15 जागा मिळाल्या होत्या. मात्र नंतर काँग्रेसच्या अनेक आमदारांनी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. असे असूनही 2017 मध्ये पटेल समाज ज्या प्रकारे भाजपपासून 'वेगळा' झाले, त्याचा पक्षावर गंभीर परिणाम झाला. जर हा कल बदलला नाही, तर यावेळी भाजपला आणखी मोठा धक्का बसू शकतो. भाजपने सौराष्ट्रात पक्ष मजबूत करण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. त्यांनी येथील पटेल नेत्यांना पक्षात स्थान दिले आहे. तसेच अनेक योजना सुरू केल्या आहेत. या भागात काँग्रेसचे तगडे नेते भाजपात सामिल झाले आहेत. येथील काही जागांवर पोटनिवडणूक झाली, त्यातही भाजपचा विजय झाला आहे. मात्र 2017 चा ट्रेंड आटोक्यात आणण्यात सौराष्ट्रातील भाजप अपयशी ठरला, तर राज्यात त्याचा फटका सहन करण्याची तयारी पक्षाने ठेवावी. भाजपला हे नुकसान भरून काढणे कठीण होईल. दुसऱ्या टप्प्यात उत्तर, मध्य आणि आदिवासी बहूल भागात निवडणुका होणार आहेत. म्हणजेच भाजपला एकंदरीत राज्यात चांगली कामगिरी करायची असेल तर सौराष्ट्रातही चांगली कामगिरी करावी लागेल.

मोरबी दुर्घटना आणि आपची एंट्री : आता काँग्रेसच्या मतदारांवरही विचार करण्याची वेळ आली आहे. त्यांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे की ते काँग्रेसला मत देतात, पण त्यांचे नेते नंतर पक्ष बदलतात. अशा नेत्यांना मतदान करणे योग्य ठरेल का? कमकुवत काँग्रेस ही आपली ताकद आहे. त्यामुळे काँग्रेसला सौराष्ट्रातही चांगली कामगिरी करता येणार नाही, अशी भाजपची अपेक्षा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम आदमी पक्ष आणि मोरबीच्या घटनेने मतदारांत किती बदल घडला. यावर आतापर्यंत फारशी चर्चा झालेली नाही. त्यामुळे भाजपही पूर्णपणे आश्वस्त नाही.

सुरतचा कल हाच सौराष्ट्राचा कल! : सौराष्ट्राबरोबरच दक्षिण गुजरातमध्येही पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचे केंद्र सुरत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील तसेच गुजरात मंत्रिमंडळातील हेवीवेट नेते हर्ष संघवी हे दोघेही सुरतचे आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे गेल्या काही काळापासून सुरतच्या राजकारणाचा सौराष्ट्राच्या राजकारणावर चांगलाच प्रभाव पडला आहे. सर्वसाधारणपणे, सुरतचा कल हा सौराष्ट्राचा कल बनतो आहे. तसे पाहिले तर भौगोलिकदृष्ट्या दोन्ही प्रदेश दूर आहेत. मात्र या मागील कारण म्हणजे, सुरतचे हिरे पॉलिश करणारे मजूर हे प्रामुख्याने सौराष्ट्रातील स्थलांतरित आहेत. जेव्हा ते त्यांच्या घरी परततात तेव्हा ते दोन्ही क्षेत्रांची माहिती तर ठेवतातच, शिवाय इतरांनाही या बदद्ल माहिती देतात.

आपचा सुरतमध्ये चंचुप्रवेश : 2015 मध्ये पाटीदार आंदोलनामुळे सुरतमध्ये हार्दिक पटेलचा मोठा प्रभाव होता. सुरतच्या हिरे उद्योगात काम करणाऱ्या मजुरांमध्ये त्यांचा प्रभाव होता. मात्र, आता हार्दिक पटेलने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत AAP ला 28 टक्के मते व 27 जागा मिळाल्या होत्या. या निकालावरून असे दिसून येते की, सुरतमध्ये 'आप'ने आपला पाया प्रस्थापित केला आहे. आता हळूहळू दक्षिण गुजरातमध्येही आपचा प्रभाव दिसून येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.