वॉशिंग्टन - स्मार्टफोनचे लॉक खोलण्याची पद्धतीवरून वापरकर्त्याचे वय सांगता येऊ शकते, असा दावा एका अभ्यासाअंती करण्यात आला आहे. 'ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठा'ने केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती मिळाली.
अवैध वापरकर्त्यांपासून स्मार्टफोन कसा सुरक्षित ठेवता येईल याबाबत आम्ही संशोधन करत आहोत. त्यासाठी अगोदर वापरकर्त्यांच्या फोन हाताळण्याच्या सवयींचा अभ्यास करणे आवश्यक आहे. यातून भविष्यात स्मार्टफोन निर्मितीसाठी याचा उपयोग होईल, असे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख प्राध्यापक कॉन्स्टेंटीन यांनी सांगितले.
हेही वाचा - INX media case: सर्वोच्च न्यायालयात पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर
प्रत्येक दहा वर्षाच्या अंतरानंतर स्मार्टफोन वापरण्याच्या सवयी आणि पद्धतीमध्ये बदल होतो. तसेच फोन वापरण्याचा वेळही २५ टक्क्यांनी कमी होतो. महिलांच्या तुलनेत पुरूष फोनचे लॉक उघडण्यासाठी ऑटोमोडचा जास्त वापर करतात. महिला जास्त काळ आपल्या फोनचा वापर करतात. एकोणीस ते त्रेसष्ट वयोगटातील १३४ लोकांचा दोन महिने अभ्यास केल्यानंतर हे संशोधन समोर आले.