नवी दिल्ली - स्मार्टफोन ब्रँड मोटोरोला (Smartphone brand Motorola) भारतामध्ये आपला फ्लॅगशिप स्मार्टफोन मोटो एज एक्स ३० (smartphone Moto Edge X30) लॉन्च करणार आहे.
भारतीय मानक ब्युरो (Bureau of Indian Standards) ने मोटोरोला एज X30 मॉडेल नंबर XT2201-01 भारतीय बाजार विक्रीसाठी निश्चित केले आहे. याबाबत नुकतीच घोषणा करण्यात आली. Moto Edge X30 मध्ये 6.7 इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले आहे, 144Hz रिफ्रेश रेट आणि 576Hz टच सॅंपलिंग रेट आहे. स्क्रीनमध्ये 100 DCI P3 कलर, HDR10+, एक पंच होल कटआउट आणि एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देखील आहे.
हे आहेत स्मार्टफोनमध्ये फीचर
स्मार्टफोनमध्ये मागे ट्रिपल कॅमेरा आहेत, f/1.88 अॅपर्चर, 50MP का प्रायमरी OV50A40 सेन्सर, 5MP का अल्ट्रा-वाइड-अँगल लेंस आणि 2MP चे सेंसर आहे. सेल्फी आणि व्हिडिओ चॅटसाठी 60MP का कॅमेरा आहे. हा फोन 163.56 X 75.95 X 8.49 मिमी असून आणि वजन 194 ग्रॅम आहे.यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८ जेन १ (Qualcomm Snapdragon 8 Gen 1) प्रॉसेसर आहे. कनेक्टिव्हिटी फीचरमध्ये 5 जी, 4 जी एलटी, वाय-फाय 6, एनएफसी, ब्लूटूथ 5.2, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट समाविष्ट आहेत.
हेही वाचा - अॅपलकडून आयफोन 13 लाँच; जाणून घ्या, किमतीसह वैशिष्ट्ये