ETV Bharat / jagte-raho

औरंगाबाद शहरात वाहन चोरट्यांचा धुमाकूळ, तीन दुचाकी लांबवल्या - औरंगाबादेत चोरांनी दुचाकी पळवली

शहरात दुचाकी चोरांनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील विविध भागातून चोरांनी दुचाकी लांबवल्या आहेत.

bike
पोलीस आयुक्तालय
author img

By

Published : Aug 31, 2020, 7:09 PM IST

औरंंगाबाद - दुचाकी वाहन चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घातला असून सिटीचौक, मुकुंदवाडी, वाळूज येथून चोरांनी तीन दुचाकी लंपास केल्या आहेत. या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेख रफीकुद्दीन मोहम्मद खुर्शीद (वय३१, रा.गणेश कॉलोनी) हे मौलाना आझाद महाविद्यालयात गेले असता त्यांनी त्यांची दुचाकी (एम एच २० सिके१६१९) बाहेर उभी केली असता चोरट्याने ती लंपास केली. या प्रकरणी सिटीचौक ठण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष रावसाहेब पाचे (वय २६,रा. गोलटगाव, ता. औरंगाबाद) यांचा भाचा योगेश चाळगेला सर्प दंश झाल्याने ते सुमनांजली रुग्णालयात गेले होते. तेथे त्यांनी त्यांची दुचाकी (एम एच २० इ. डब्ल्यु ८२८६) रूग्णालयासमोर उभी केली असता चोरट्याने चोरून नेली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसरी घटना वाळूज येथील बाजार गल्लीत घडली. अय्युब ईंना शाह फकीर (वय ३६, रा. बायजीपुरा) हे नातेवाईकांकडे गेले असता चोरट्यांनी त्यांची दुचाकी (एम एच २० बीडी १२३७) लंपास केली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.