मुंबई - एका अल्पवयीन मुलीचे फोटो, व्हिडिओ एडिट (मॉर्फ) करून अश्लिल फोटो व व्हिडीओ बनविणाऱ्या एका २० वर्षीय आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील पीडित अल्पवयीन असून तिला मागील काही महिन्यांपासून आरोपी ब्लॅकमेल करत होता.
आरोपीकडून येणाऱ्या सततच्या धमकीमुळे कंटाळलेल्या पीडितेने शेवटी या प्रकरणाची माहिती तिच्या पालकांना दिली. तेव्हा पालकांनी या संदर्भात मुंबईतील टी मार्ग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला. यावरुन पोलिसांनी तपास सुरू केला आणि एका आरोपीला अटक केली.
आरोपी मुंबईतील प्रतिष्ठीत महाविद्यालयात टी वाय बी कॉम मध्ये शिकत असून त्याची चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या अगोदर इतर दोन मुलींसोबत अशाच प्रकारचे कृत्य केल्याचेही पोलीस तपासात आरोपीने कबुल केले आहे.
पोलिसांनी आरोपीचा घेतला असा शोध -
आरोपी पकडला जाऊ नये म्हणून मोबाईलमध्ये सिमकार्ड वापरत नसे. तो वायफायच्या आयपी अॅड्रेसवरून हे कृत्य करत असे. पोलिसांनी आरोपीचे इन्साग्राम व स्नॅपचॅटवर बनवलेल्या बनावट अकाउंटवरु शोध घेत त्याला अटक केली.
हेही वाचा - मनसेचे नवनियुक्त आमदार प्रमोद पाटील यांचे शर्मिला ठाकरेंकडून औक्षण