ETV Bharat / jagte-raho

मुंबई: भाजीपाल्यांमधून तस्करी होणारा 106 किलो गांजा जप्त - मुंबई अमली पदार्थ तस्करी न्यूज

अमली पदार्थ विरोधी पथकाला गांजा विक्रीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून 4 जानेवारीला विक्रोळी परिसरामध्ये पथकाने सापळा रचला होता.

अटकेतील टोळीसह अमली पदार्थ विरोधी पथक
अटकेतील टोळीसह अमली पदार्थ विरोधी पथक
author img

By

Published : Jan 5, 2021, 5:28 PM IST

Updated : Jan 5, 2021, 6:34 PM IST

मुंबई - अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीला मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या बांद्रा युनिटने कारवाईदरम्यान अटक केली आहे. या टोळीकडून तब्बल 21 लाख रुपयांचा 106 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाला गांजा विक्रीबाबत गुप्त माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीवरून 4 जानेवारीला विक्रोळी परिसरामध्ये पथकाने सापळा रचला होता.

तस्करी होणारा 106 किलो गांजा जप्त

हेही वाचा-...तर प्रदेशाध्यक्षपद सोडण्यास तयार; बाळासाहेब थोरातांचे मोठे वक्तव्य

कांदा भाजीपालाच्या मालात गांजा लपवून करत होते विक्री

अटक करण्यात आलेले आरोपी हे धुळे येथून टेम्पोमध्ये भाजीपाला व कांदा विक्री करण्याच्या नावाखाली गांजा आणत होते. हे अमली पदार्थ लपवून मुंबई व मुंबई उपनगरमध्ये विक्री करत असल्याचे पोलिसांना कारवाईदरम्यान आढळून आले आहे. यासंदर्भात पोलिसांनी इशरत शफिक सिद्दिकी उर्फ पप्पू (37) आनंद तरडे (35) अफरोज शब्बीर सिद्दिकी उर्फ ममो(27) या आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले हे तिन्ही आरोपी मुंबईतील कुर्ला व साकीनाका परिसरात राहणारे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून परप्रांतीय तस्करांसोबत मिळून ही टोळी मुंबई व मुंबई उपनगरांमध्ये अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे तपासात समोर आले आहे.

हेही वाचा-'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’!

अमली पदार्थ विरोधी पथकाने गाजांसह 106 किलो गांजासह 7 लाख रुपयांचा आयशर टेम्पोसुद्धा जप्त केला आहे. या आरोपींच्या टोळीमध्ये मुंबईत आणखीन किती जण सामील आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Jan 5, 2021, 6:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.