ETV Bharat / jagte-raho

पोलीस दलातील जवानाचा महिलेशी अश्लील संवाद, गुन्हा दाखल - crime

महिलेशी अश्लील संवाद केल्याप्रकरणी जवनाविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या प्रकरणाची नागपूरच्या 'वि फोर चेंज' या महिला संघटनेने गंभीर दखल घेत पोलिसांनी लावलेले कलम अतिशय सौम्य असून या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

महिलेशी गैरवर्तन
author img

By

Published : Jul 19, 2019, 2:14 PM IST

गडचिरोली- सिमेंट विटा निर्मितीच्या कारखान्यात कामगार असलेल्या महिलेला सी-60 पथकातील जवानाने अश्लील संवाद केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी त्या जवनाविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून त्या जवानावर कारवाई केली जाईल, असे संकेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले. मात्र, या प्रकरणाची नागपूरच्या 'वि फोर चेंज' या महिला संघटनेने गंभीर दखल घेत पोलिसांनी लावलेले कलम अतिशय सौम्य असून या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.

मिथुन रासेकर असे त्या जवानाचे नाव असून तो अहेरी येथील उपजिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत आहे. गडचिरोली येथील एमआयडीसी परिसरात सिमेंट विटा निर्मितीच्या कारखान्यात परप्रांतीय महिला व पुरुष काम करतात. यातील एक कामगार महिला लगतच्या नळावर पाणी भरण्यासाठी गेली असता, रासेकर याने त्या महिलेशी अश्लील भाषेत संवाद साधून शरीरसुखाची मागणी केली. त्याचे हे वर्तन बघून महिला घाबरून गेली व ती धावत येऊन मालक मलिक बुधवानी यांना घडला प्रकार सांगितला.

महिलेशी गैरवर्तन प्रकरणी गुन्हा दाखल

बुधवाणी यांनी तत्काळ गडचिरोली पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या जवानाला ताब्यात घेतले व त्याच्यावर 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेच्या दिवशी तो कर्तव्यावर गैरहजर होता. त्यामुळे त्याची चौकशी करून सेवाशर्ती नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती गडचिरोलीचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी दिली.

दरम्यान वि फोर चेंज या नागपूरच्या महिला संघटनेने प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. C-60 चा जवान मिथुन रासेकर याने एसपी ऑफिस पासून एक किलोमीटरच्या परिघामध्ये दारू पिऊन महिलेची छेडखानी व गुंडागर्दी करण्याचा जो गुन्हा केलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. या जवानामुळे शिस्तबद्ध पोलीस दल ही गडचिरोली पोलीस दलाची प्रतिमा मलिन होते. एवढे असूनही त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न पोलीस विभाग करतो आहे. त्याच्यावर सौम्य कलम लावलेली आहेत. या बेशिस्त, बेछूट आणि व्यसनी जवानाला पाठीशी घालू नये तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वि फोर चेंजच्या समन्वय प्रा. रश्मी पारसकर, प्रा. दीपाली मेश्राम, डॉ. चित्रा तूर, सुनयना अजात यांनी केली आहे.

विटा कंपनीचे मालक बुधवणी मिथुन रासेकरला समजावण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा त्याने मी पोलीस आहे, एसपीचा माणूस आहे. तुम्ही माझे काही बिघडवू शकत नाही. तुम्हाला काय करायचे करून घ्या, असे म्हणून मालकाला व कामगारांना धमकावले. या धमकावणीला घाबरून मलिक बुधवानी यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस ताब्यात घेतात म्हटल्यावर मिथुन रासेकर घाबरला. पीडिता महिलेला मला माफ कर, तुला एक लाख रुपये देतो असे म्हणाला.

त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये पीडित महिलेचा जबाब नोंदवण्यात आला. F. I. R. मध्ये मिथुन रासेकर वर 509 हे सौम्य कलम लावले. तसेच मिथुन रासेकरला अटक करण्यात आली नाही. ना त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली. पोलीस या प्रकरणात C-60 च्या जवानाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. मिथुन रासेकर ऐवजी जर कोणी सामान्य नागरिकाने असा गुन्हा केला असता तर पोलिसांनी कडक कारवाई केली असती. मिथुन रासेकरवर आयपीसी 354 (विनयभंगाचा प्रयत्न) आयपीसी 441 (टेसपासिंग), आयपीसी 503 (धमकवणे) हे कलम लावावे व त्याला त्वरित अटक करून निलंबित सुद्धा करण्यात यावे, अशी मागणी करीत राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याचे वी फोर चेंज या संघटनेने म्हटले आहे.

Intro:पोलीस दलातील सी-60 जवानाच्या विरोधात महिलेशी गैरवर्तन प्रकरणी गुन्हा दाखल

गडचिरोली : सिमेंट विटा निर्मितीच्या कारखान्यात कामगार असलेल्या महिलेला सि-60 पथकातील जवानाने अश्लील संवाद केल्याने त्या जवनाविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करून त्या जवानावर योग्य कारवाई केली जाईल, असे संकेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले. मात्र या प्रकरणाची नागपूरच्या वि फोर चेंज या महिला संघटनेने गंभीर दखल घेत पोलिसांनी लावलेले कलम अतिशय सौम्य असून या प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याचे म्हटले आहे.Body:मिथुन रासेकर असे त्या जवानाचे नाव असून तो अहेरी येथील उपजिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. गडचिरोली येथील एमआयडीसी परिसरात सिमेंट विटा निर्मितीच्या कारखान्यात परप्रांतीय महिला व पुरुष काम करतात. यातील एक कामगार महिला लगतच्या नळावर पाणी भरण्यासाठी गेली असता, मिथुन रासेकर याने त्या महिलेशी अश्लील भाषेत संवाद साधून शरीरसुखाची मागणी केली. त्याचे हे वर्तन बघून महिला घाबरून गेली व ती धावत येऊन मालक मलिक बुधवानी यांना सांगितली.

बुधवाणी यांनी तत्काळ गडचिरोली पोलिसांशी संपर्क साधून तक्रार दिली. तेव्हा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ गाठून त्या जवाणाला ताब्यात घेतले व त्याच्यावर 509 कलमान्वये गुन्हा दाखल केला. घटनेच्या दिवशी तो कर्तव्यावर गैरहजर होता. त्यामुळे त्याची चौकशी करून सेवाशर्ती नियमानुसार कारवाई केली जाईल, अशी माहिती गडचिरोलीचे ठाणेदार प्रदीप चौगावकर यांनी दिली.

दरम्यान वि फोर चेंज या नागपूरच्या महिला संघटनेने प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. C-60 चा जवान मिथुन रासेकर याने एसपी ऑफिस पासून एक किलोमीटरच्या परिघामध्ये दारू पिऊन महिलेची छेडखानी व गुंडागर्दी करण्याचा जो गुन्हा केलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. या जवानामुळे शिस्तबद्ध पोलीस दल ही गडचिरोली पोलीस दलाची प्रतिमा मलिन होते. एवढे असूनही त्याला संरक्षण देण्याचा प्रयत्न पोलिस विभाग करतो आहे. त्याच्यावर सौम्य कलम लावलेली आहेत. या
बेशिस्त, बेछूट आणि व्यसनी जवानाला पाठीशी घालू नये तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी
मागणी वि फोर चेंजच्या समन्वय प्रा. रश्मी पारसकर, प्रा. दीपाली मेश्राम, डॉ. चित्रा तूर, सुनयना अजात यांनी केली आहे.

विटा कंपनीचे मालक बुधवणी मिथुन रासेकरला समजावण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हा
त्याने मी पोलीस आहे, एस. पी. चा माणूस आहे. तुम्ही माझे काही बिघडवू शकत नाही. तुम्हाला काय
करायचे करून घ्या, असे म्हणून मालकाला व कामगारांना धमकावू लागला. या धमकावणीला घाबरून
मलिक बुधवानी यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस ताब्यात घेतात म्हटल्यावर मिथुन रासेकर घाबरला.
पीडिता महिलेला मला माफ कर, तुला एक लाख रुपये देतो असे म्हणाला. पोलीस घटनास्थळी आले.
त्यानंतर पोलिसस्टेशनमध्ये पीडित महिलेचे बयान नोंदवण्यात आले. F. I. R. मध्ये मिथुन रासेकर वर 509 हे सौम्य कलम लावले. तसेच मिथुन रासेकरला अटक करण्यात आली नाही किंवा त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलीस या प्रकरणात C-60 च्या जवानाला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. मिथुन रासेकर ऐवजी जर कोणी सामान्य नागरिकाने असा गुन्हा केला असता तर पोलिसांनी कडक कारवाई केली असती. मिथुन रासेकरवर आयपीसी 354 (विनयभंगाचा प्रयत्न) आयपीसी 441 (टेसपासिंग), आयपीसी 503 (धमकवणे) हे कलम लावावे व त्याला त्वरित अटक करून निलंबित सुद्धा करण्यात यावे, अशी मागणी "करीत राष्ट्रीय महिला आयोगाकडे दाद मागणार असल्याचे वी फोर चेंज या संघटनेने म्हटले आहे.

Conclusion:सोबत गडचिरोली पोलीस ठाण्याचे विजवल, पीडित महिलेचा बाईट आणि विटा कंपनी मालकाचा बईट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.