नाशिक - शहराच्या तपोवन परिसरातील रामटेकडी भागांमध्ये रविवारी (दि.13) काही नागरिक फिरत असताना त्यांना कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह आढळून आला होता. हा मृतदेह एका सतरा ते वीस वर्षातील अल्पवयीन मुलीचा असल्याचा अंदाज त्यावेळी पोलिसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अज्ञात अरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 2 दिवसात या गुंतागुंतीच्या खुनाचा छडा लावला आहे.
तपोवन परिसरामध्ये एक वैद्य असून तो जडीबुटीच्या सहाय्याने गर्भपात करून देत असल्याची खोटी माहिती दानिशने त्या तरुणीला दिली. त्यानंतर तिला 5 डिसेंबरला रात्री दोन वाजेच्या सुमारास तपोवन भागातील रामटेकडी परिसरात नेले आणि याठिकाणी तिचा गळा आवळून आणि तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. ही सर्व माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. मृतदेह सापडल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये उपलब्ध माहितीच्या आधारे गुन्हे शाखा आणि भद्रकाली पोलिसांनी या कुजलेल्या मृतदेह प्रकरणाचा उलगडा लावला. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.