वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जाहीर केले की ते पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी पुन्हा निवडणूक लढवणार आहेत. जो बायडन यांनी मंगळवारी औपचारिकपणे जाहीर केले की ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसरी टर्म निवडणूक लढतील. यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी पुन्हा त्यांचा सामना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अमेरिकन लोकांच्या मूलभूत स्वातंत्र्यासाठी त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी आपण निवडणूक लढवणार आहे. मला विश्वास आहे की आम्ही पुन्हा सत्ते येऊ, असे ट्विट जो बायडन यांनी आज केले आहे. लोकांनी आमच्याबरोबर यावे असे आवाहन केले आहे. चला राहिलेले काम पूर्ण करूया, असे राष्ट्राध्यक्षांनी पुढे ट्विटमध्ये म्हटले आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मंगळवारी अध्यक्षपदासाठी आपली मोहीम सुरू केली. लेट्स फिनिश द जॉब, असे ते म्हणाले.
जो बायडन हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात वयस्कर राष्ट्राध्यक्ष आहेत. येत्या 2024 च्या यूएस अध्यक्षपदाच्या निवडणुका जवळ येत असताना, कंझर्व्हेटिव्ह टॉक रेडिओ होस्ट लॅरी एल्डर यांनी रिपब्लिकन अध्यक्षपदाच्या तिकिटासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. अमेरिका घसरणीला लागली आहे. परंतु ही घसरण अपरिहार्य नाही,असे लॅरी एल्डर यांनी गुरुवारी ट्विट केले होते. अमेरिकन नवीन सुवर्णयुगात आपल्याला जायचे आहे, परंतु आपण एक नेता निवडला पाहिजे जो आपल्याला तिथे नेऊ शकेल. म्हणूनच मी अध्यक्षपदासाठी निवडणूक रिंगणात आहे, असे ट्विटमध्ये ते पुढे म्हणतात. त्याचवेळी एल्डर यांनी आपली उमेदवारी जाहीर केली.
माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन पक्षात एल्डर आहेत. त्यांच्याबरोबर सॉफ्टवेअर उद्योजक विवेक रामास्वामी, माजी आर्कान्सा गव्हर्नर आसा हचिन्सन आणि माजी संयुक्त राष्ट्र राजदूत निक्की हेली यांचा समावेश आहेत. गेल्या आठवड्यात, सिनेटर टिम स्कॉट (R-S.C.) यांनी शोध समिती स्थापन करण्याची घोषणा केली. इतर संभाव्य उमेदवारांमध्ये फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस (आर) आणि माजी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांचा समावेश आहे. अध्यक्षीय मोहिमेसाठी वेबसाइटवर, एल्डर यांनी इतर प्राधान्यक्रमांबरोबरच, गुन्हेगारीशी लढा देणे, वांशिक शांततेला प्रोत्साहन देणे, महागाईला तोंड देणे, अर्थव्यवस्था वाढवणे आणि सीमा सुरक्षित करणे यावर प्रकाश टाकला आहे.