ETV Bharat / international

Bombing In T20 Match : टी-20 सामन्या सुरु असतानाच खचाखच भरलेल्या क्रिकेट स्टेडियमवर आत्मघाती बॉम्बस्फोट - Bombing In T20 Match

अफगाणिस्तानमधील काबुल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये स्फोट झाला ( Suicide bombing at Kabul Stadium ) असून, त्यानंतर खेळाडूंना बंकरमध्ये नेण्यात आले आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. ( blast at Kabul International Cricket Stadium )

Bombing In T20 Match
क्रिकेट स्टेडियमवर आत्मघाती बॉम्बस्फोट
author img

By

Published : Jul 29, 2022, 8:51 PM IST

हैदराबाद : अफगाणिस्तानातील काबुल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट ( blast at Kabul International Cricket Stadium ) झाला. स्फोटाच्या वेळी स्टेडियममध्ये टी-20 सामना सुरू होता. स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरले होते. काबुल इंटरनॅशनल स्टेडियमवर पामीर झाल्मी आणि बँड-ए-अमिर ड्रॅगन्स यांच्यातील शापेझा क्रिकेट लीगच्या 22 व्या लीग सामन्यादरम्यान ही घटना घडली.

खेळाडूंना नेण्यात आले बंकरमध्ये : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील अलोकोजे काबुल आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर झालेल्या बॉम्बस्फोटाने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी संध्याकाळी, 29 जुलै रोजी, काबूलमधील शपेझा क्रिकेट लीग सामन्यादरम्यान स्टँडमध्ये प्रेक्षकांमध्ये बॉम्बस्फोट झाला. ताज्या वृत्तानुसार, काबुलमध्ये अफगाणिस्तान प्रीमियर टी-२० स्पर्धेदरम्यान आत्मघाती स्फोट झाला. दोन्ही बाजूंच्या खेळाडूंना एका बंकरमध्ये नेण्यात आले. हल्ला झाला तेव्हा संयुक्त राष्ट्राचे अधिकारीही स्टेडियममध्ये उपस्थित होते.

स्फोटात अनेक जण जखमी - स्फोटामुळे घबराट निर्माण झाल्याने प्रेक्षक सुरक्षिततेकडे धावताना दिसत होते कारण स्टेडियममध्ये उपस्थित सर्वांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काबुल इंटरनॅशनल स्टेडियमवर पामीर झाल्मी आणि बँड-ए-अमिर ड्रॅगन्स यांच्यातील शापेझा क्रिकेट लीगच्या 22व्या लीग सामन्यादरम्यान ही घटना घडली. काबूल पोलिस मुख्यालयाने या घटनेला दुजोरा दिला आहे, मात्र अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. काबूल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत

हेही वाचा - Girl Rescued From Borewell: बोरवेलमध्ये पडलेली मुलगी बाहेर काढण्यात यश; ध्रंगधरा तालुक्यातील घटना

यापूर्वी झाला होता गुरुद्वारावर हल्ला - ऑगस्ट 2021 मध्ये तालिबान सत्तेवर आल्यापासून दहशतवादी हल्ल्यांनी अफगाण राजधानीवर कब्जा केला आहे आणि अलीकडेच इस्लामिक स्टेटच्या सदस्यांनी अनेक धार्मिक स्मारकांना लक्ष्य केले आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला काबुलमधील कर्ता परवान गुरुद्वाराजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर गेल्या महिन्यात आणखी एक स्फोट झाला, जेव्हा इस्लामिक स्टेट खोरासान प्रांताने गुरुद्वारावर हल्ला केला आणि डझनभर शीख आणि तालिबान सदस्यांचा जीव घेतला.

हेही वाचा - Beer Truck Overturned : बीअरने भरलेला ट्रक उलटला; लोकांनी मारला डल्ला, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.