ETV Bharat / international

Shoot on Sight Orders in Srilanka : श्रीलंकेत अराजकता... दंगलखोरांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे संरक्षण मंत्रालयाचे आदेश - श्रीलंका संरक्षण मंत्रालय आदेश

देशाच्या वाढत्या आर्थिक संकटावर त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणाऱ्या सरकारविरोधी निदर्शकांवर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सोमवारी ( Mob attack on Mahinda Rajapaksa home ) हल्ला केला. त्यानंतर हिंसाचाराचा भडका उडाला. त्यात आठ जण ठार ( 8 killed in srilanka violence ) झाले. त्याचवेळी कोलंबो आणि इतर शहरांमध्ये झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. देशातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा राजपक्षे यांनी सोमवारी ( Mahinda Rajapaksa resigned on Monday ) आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Shoot on Sight Orders in Srilanka
श्रीलंकेत अराजकता
author img

By

Published : May 10, 2022, 10:52 PM IST

कोलंबो- श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत अराकता निर्माण ( Srilanka crisis update ) झाली आहे. या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी सार्वजनिक मालमत्तेची लूट करणाऱ्या किंवा नागरिकांना दुखापत करणाऱ्या कोणत्याही दंगलखोराला गोळ्या घालण्याचे आदेश सैन्य, हवाई दल आणि नौदलाच्या ( shoot on sight orders in Srilanka ) कर्मचार्‍यांना दिले. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी लोकांना हिंसा आणि सूडाची कृत्ये थांबवण्याचे आवाहन केल्यानंतर मंत्रालयाने हे आदेश काढले आहेत.

देशाच्या वाढत्या आर्थिक संकटावर त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी करणाऱ्या सरकारविरोधी निदर्शकांवर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सोमवारी ( Mob attack on Mahinda Rajapaksa home ) हल्ला केला. त्यानंतर हिंसाचाराचा भडका उडाला. त्यात आठ जण ठार ( 8 killed in srilanka violence ) झाले. त्याचवेळी कोलंबो आणि इतर शहरांमध्ये झालेल्या हिंसाचारात 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. देशातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा राजपक्षे यांनी सोमवारी ( Mahinda Rajapaksa resigned on Monday ) आपल्या पदाचा राजीनामा दिला.

दंगलखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश- राजधानी कोलंबोमध्ये लष्कराचे जवान तैनात करण्यात आले होते. महिंद्रा राजपक्षे यांच्या समर्थकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या कार्यालयाबाहेर निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर देशव्यापी कर्फ्यू लागू करण्यात आला. संरक्षण प्रवक्त्याचा हवाला देत स्थानिक माध्यमाने म्हटले, की सार्वजनिक मालमत्तेची लूट करणाऱ्या किंवा सर्वसामान्यांना इजा करणाऱ्या दंगलखोरांना गोळ्या घालण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाने तिन्ही दलाला दिले आहेत.

हिंसाचारात मृतांची संख्या आठ - श्रीलंकेत मंगळवारी सरकार समर्थक आणि विरोधकांमध्ये झालेल्या संघर्षात मृतांची संख्या आठ झाली आहे. तर जवळपास 250 लोक जखमी झाले आहेत. महिंद्रा राजपक्षे यांच्या समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केला. अधिकाऱ्यांना राजधानीत सैन्य तैनात करण्यास भाग पाडले. त्यानंतर देशव्यापी कर्फ्यू लागू केला.

त्रिंकोमाली नौदल तळावर निदर्शने- श्रीलंकेच्या त्रिंकोमाली नौदल तळासमोर मंगळवारी निदर्शने सुरू झाली. माजी पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे आणि त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कोलंबोमधील त्यांचे अधिकृत निवासस्थान सोडले. हे माहिती मिळताच लोकांनी निषेध करण्यास सुरुवात केली. त्रिंकोमाली हे श्रीलंकेच्या उत्तर-पूर्व किनाऱ्यावर वसलेले एक बंदर शहर आहे. मंगळवारी सकाळी महिंद्रा राजपक्षे हे त्यांचे अधिकृत टेम्पल ट्रीज निवासस्थान सोडत असताना एका जमावाने आवारात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. टेम्पल ट्रीज निवासस्थानात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सोमवारी रात्री अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या होत्या.

जनतेचा आक्रमक पवित्रा-वकिलांच्या एका गटाने महिंद्रा राजपक्षे आणि त्यांच्या साथीदारांना अटक करण्यासाठी पोलीस मुख्यालयात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, महिंद्राराजपक्षे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ले करण्यास प्रवृत्त केले होते. राजपक्षे यांच्या हंबनटोटा येथील वडिलोपार्जित निवासस्थानासह अनेक नेत्यांची लोकांनी सोमवारी घरे जाळली आहेत. 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून श्रीलंका आजवरच्या सर्वात गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. मुख्यतः परकीय चलनाच्या कमतरतेमुळे हे संकट उद्भवले आहे. श्रीलंकेकडे अन्नपदार्थ आणि इंधनाच्या आयातीसाठी पैसे देण्याची स्थिती नाही. राजपक्षे यांच्या निष्ठावंतांना श्रीलंकेतून पळून जाण्यापासून रोखण्यासाठी आंदोलकांनी विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौक्या उभारल्या आहेत.

हेही वाचा-पत्नी प्रियकराबरोबर पळून गेल्याने पतीची सासरमध्ये विष पिऊन आत्महत्या

हेही वाचा-Two militants killed in Anantnag : अनंतनाग डूरू चकमकीत दोन दहशतवादी ठार, संयुक्त सुरक्षा दलाची कारवाई

हेही वाचा-Ramya Suicided in Tamilnadu : सासरी शौचालय नसल्याने नवविवाहितेची आत्महत्या, तामिळनाडूमधील ह्रदयद्रावक घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.