सिंगापूर: सिंगापूरमध्ये नवीन ओमिक्रॉन सबवेरियंट BA.2.12.1 च्या दोन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तेथील आरोग्य मंत्रालयाने (MOH) गुरुवारी (28 एप्रिल) रात्री आपल्या दैनंदिन अपडेटमध्ये म्हटले आहे की, कोरोनाच्या या नवीन प्रकारावर आमचे अधिकारी सक्रिय पद्धतीने लक्ष ठेऊन आहेत.
नवीन व्हेरिएंटबद्दल नाही जास्त माहिती- अत्यंत संसर्गजन्य असलेला नवीन Omicronचा व्हेरिएंट आला असला तरी सध्यातरी असे कोणतेही पुरावे नाहीत की यामुळे अधिक गंभीर रोग होतो. मार्चच्या मध्यापर्यंत BA.2 हा जागतिक स्तरावर प्रमुख व्हेरिएंट बनला होता. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने 19 एप्रिल रोजी सांगितले की, 16 एप्रिलपर्यंत युनायटेड स्टेट्समधील कोरोना व्हायरस प्रकारांपैकी BA.2.12.1 व्हेरिएंट आणि त्याचे सबलाइनेज 90 टक्क्यांहून अधिक बनतील असा अंदाज आहे.
सिंगापूरमध्ये कोरोनामुळे अजूनही अनेक ठिकाणी निर्बंध लावण्यात आले आहेत. या निर्बंधांमध्ये सूट देण्याच्यादृष्ठीने प्रशासनातर्फे उपाययोजना करण्यात येत आहेत. सिंगापूरमधील रेस्टॉरंट्स, केटरर्स पुन्हा सुरू करू शकतात. तर सर्व कर्मचार्यांना कामाच्या ठिकाणी परत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. काही कामगार असेही म्हणतात की, ते COVID-19 उपाय सुलभ करूनही कार्यालयात मास्क काढणार नसल्याचे वृत्त एका चॅनेलने दिले आहे.
पीटीआय