वॉशिंग्टन : अमेरिकेत सलग दुसऱ्या दिवशी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी पहाटे इंडियाना प्रांतातील गॅरी येथे एका ब्लॉक पार्टीदरम्यान झालेल्या गोळीबारात ( Shooting during party in Indiana region ) तीन जण ठार झाले आणि सात जण जखमी झाले. गॅरी पोलिसांनी सांगितले की त्यांना मिसुरी स्ट्रीटच्या 1900 ब्लॉकमध्ये रात्री 12:45 च्या सुमारास झालेल्या गोळीबारात अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली.
घटनेनंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिका-यांनी सांगितले की, तपासकर्ते गोळीबाराच्या परिस्थितीचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत, ज्यात एकापेक्षा जास्त आरोपी सामील होते का?
याआधी, शिकागोच्या डाउनटाउनमधील हायलँड पार्कजवळ सोमवारी स्वातंत्र्यदिनाच्या परेडदरम्यान एका हल्लेखोराने इमारतीच्या छतावरून गोळीबार ( Shooting during the Independence Day parade ) केला. या गोळीबारात किमान सहा जण ठार झाले, तर सुमारे 30 जण जखमी झाले.
हेही वाचा - India-Iran Discussion : भारत आणि इराणमध्ये चाबहार बंदर आणि इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर झाली चर्चा