नवी दिल्ली: पाकिस्तानला शाहबाज शरीफ यांच्या रूपाने नवा पंतप्रधान मिळाला ( Pakistan New PM Shahbaz Sharif ) आहे. मुस्लिम लीग-नवाज (पीएमएल-एन) चे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांची सोमवारी नॅशनल असेंब्लीमध्ये मतदान झाल्यानंतर पंतप्रधानपदी बिनविरोध निवड झाली आहे. इम्रान खान यांच्या पक्षाने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. पाकिस्तानमध्ये नवीन पंतप्रधान निवडीपूर्वी, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ ( Pakistan Tehreek-e-Insaf ) पक्षाने संसदेतून राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. ते रात्री पंतप्रधान पंदाची शपथ घेतली.
माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज ( Nawaz Sharif's younger brother Shahbaz ) हे 70 वर्षांचे असून ते तीन वेळा पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री राहिले आहेत. संसदेत मतदानापूर्वी विरोधी पक्षांच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. माजी राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. झरादरी हे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) सह-अध्यक्षही आहेत.
-
Pakistan | PTI members walk out of the session to elect the new prime minister.
— ANI (@ANI) April 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Qureshi says although he was the PTI's candidate for the prime minister, he announces to boycott the election, reports Pakistan's Samaa
Source: PTV pic.twitter.com/BVUhVEO2EE
">Pakistan | PTI members walk out of the session to elect the new prime minister.
— ANI (@ANI) April 11, 2022
Qureshi says although he was the PTI's candidate for the prime minister, he announces to boycott the election, reports Pakistan's Samaa
Source: PTV pic.twitter.com/BVUhVEO2EEPakistan | PTI members walk out of the session to elect the new prime minister.
— ANI (@ANI) April 11, 2022
Qureshi says although he was the PTI's candidate for the prime minister, he announces to boycott the election, reports Pakistan's Samaa
Source: PTV pic.twitter.com/BVUhVEO2EE
कोण आहेत शाहबाज शरीफ?
शाहबाज यांचा जन्म 23 सप्टेंबर 1951 ला लाहोरमध्ये झाला. त्यांनी लाहोरमधूनच ग्रॅज्युएशन केले. त्यानंतर ते आपल्या कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. मोठे बंधू नवाझ शरीफ राजकारणात आल्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. मात्र, शरीफ कुटुंबात नवाज, शाहबाज यांच्याशिवाय तिसरा भाऊ अब्बास देखील होता. ते पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्यही होते पण 2013 मध्ये त्यांचे निधन झाले.
शरीफ तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत-
पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे प्रमुख शाहबाज शरीफ हे तीन वेळा पाकिस्तानच्या पंजाब राज्याचे मुख्यमंत्री राहिले ( three times Punjab CM ) आहेत. ते 2018 पासून देशाच्या नॅशनल असेंब्लीचे सदस्य आहेत. 1999 मध्ये देशात झालेल्या लष्करी बंडानंतर शाहबाज आपल्या कुटुंबासह सौदी अरेबियात स्व-निर्वासित झाले होते. त्यानंतर 2007 मध्ये ते परतले. त्यानंतर पंजाब विधानसभेतील विजयानंतर ते तेथील मुख्यमंत्री झाले. 2013 मध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. शाहबाज शरीफ यांनी दोन विवाह केले आहेत. पहिला विवाह 1973 मध्ये चुलत बहीण नुसरतसोबत झाला होता. तर दुसरे लग्न 2003 मध्ये पाकिस्तानमध्ये प्रसिद्ध असलेल्या तेहमीना दुर्रानीसोबत झाले होते.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांसाठी भारतात प्रार्थना-
कोणत्याही पाकिस्तानी पंतप्रधानांसाठी भारतात प्रार्थना केली जात असल्याचे ऐकून आश्चर्य वाटेल. कारण पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ ( New PM Shahbaz Sharif ) यांचे वडिलोपार्जित गाव भारतात आहे. हे गाव अमृतसरमध्ये आहे, ज्याचे नाव जाति उमरा आहे. शाहबाज पंतप्रधान व्हावेत यासाठी स्थानिक लोकांनी रविवारी येथील गुरुद्वारात एकत्र येऊन प्रार्थना केली. फाळणीनंतर शरीफ कुटुंब येथून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. तरी ते या गावाशी संपर्कात राहतात. खरे तर शरीफ यांचे कुटुंब मूळचे काश्मिरी आहे. त्यांचे वडील अनंतनागहून पंजाबच्या या गावात आले. शाहबाज यांची आई पुलवामाची आहे. फाळणीनंतर त्यांच्या वडिलांनी लाहोरमध्ये व्यवसाय सुरू केला आणि तो काळानुसार वाढत गेला. सध्या शरीफ यांचा इत्तेफाक ग्रुप हा पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे.
हेही वाचा - Russia Ukraine War : रशिया-युक्रेन युद्धाचा आजचा 47वा दिवस, युक्रेनमधून आतापर्यंत 45 लाख नागरिकांचे स्थलांतर