टोकियो : टोकियोच्या हानेडा विमानतळाच्या धावपट्टीवर एका विमानाची दुसऱ्या विमानाला धडक बसली. यानंतर यातील एका विमानाला भीषण आग लागली. घटनेनंतर विमानातील सर्व 379 प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. हानेडा विमानतळ हे जपानमधील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.
-
#WATCH | A Japan Airlines jet was engulfed in flames at Tokyo's Haneda airport after a possible collision with a Coast Guard aircraft, with the airline saying that all 379 passengers and crew had been safely evacuated: Reuters
— ANI (@ANI) January 2, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Source: Reuters) pic.twitter.com/fohKUjk8U9
">#WATCH | A Japan Airlines jet was engulfed in flames at Tokyo's Haneda airport after a possible collision with a Coast Guard aircraft, with the airline saying that all 379 passengers and crew had been safely evacuated: Reuters
— ANI (@ANI) January 2, 2024
(Source: Reuters) pic.twitter.com/fohKUjk8U9#WATCH | A Japan Airlines jet was engulfed in flames at Tokyo's Haneda airport after a possible collision with a Coast Guard aircraft, with the airline saying that all 379 passengers and crew had been safely evacuated: Reuters
— ANI (@ANI) January 2, 2024
(Source: Reuters) pic.twitter.com/fohKUjk8U9
टक्कर झालेलं विमान जपान तटरक्षक दलाचं : टक्कर झालेल्या दोन विमानांपैकी एक विमान हे जपान एअरलाइन्सचं तर दुसरं विमान हे जपान तटरक्षक दलाचं होतं. यावेळी अपघातग्रस्त जपान तटरक्षक दलाच्या विमानात 6 जण होते. याबाबत रॉयटर्सनं तटरक्षक दलाच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे. या उपघातात जपान तटरक्षक दलाच्या विमानाचा कॅप्टन सुखरूप बचावला आहे, तर उर्वरित 5 जणांचा मृत्यू झाला आहे. हे पाच जण जपान तटरक्षक दलाच्या विमानातील क्रू मेंबर्स होते.
दोन विमानांची धडक : टोकियोच्या अग्निशमन विभागानं या दुर्घटनेबाबत माहिती देताना म्हटलं आहे की, JAL 516 या क्रमांकाच्या विमानाला मोठा अपघात झाला आहे. या विमाननं टोकियो विमानतळावरील धावपट्टीवर दुसऱ्या एका विमानाला जोरदार धडक दिली. त्यामुळं यातील एका विमानाला आग लागल्याची शक्यता आहे. टोकियोच्या परिवहन तसंच पर्यटन मंत्रालयाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जपानच्या सार्वजनिक NHK टीव्हीवरील लाइव्ह फुटेजमध्ये विमानाच्या खिडक्यांमधून आग बाहेर येताना दिसून येत आहे. जपान एअरलाइन्सच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, होक्काइडो येथील शिन-चितोसे विमानतळावरून उड्डाण घेतलेल्या विमानात 300 हून अधिक प्रवासी होते.
विमानात 367 प्रवासी : अपघाताच्या वेळी विमानात सुमारे 367 प्रवासी होते. विमानातील 12 क्रू मेंबर्स व्यतिरिक्त 8 मुलांचा देखील त्यात समावेश आहे. जपानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, आग लागलेल्या विमानाची जपान कोस्ट कार्ड एअरक्राफ्ट MA722 शी टक्कर झाली, त्यानंतर त्याला विमानाला आग लागली. मात्र, टोकियो विमानतळावर अपघात झालेल्या जपान एअरलाइन्सच्या विमानातील सर्व 367 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.
हेही वाचा -