नवी दिल्ली Operation Ajay : इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असताना इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन अजय सुरू करण्यात आलंय. या अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन सहावं विमान भारतात पोहोचलंय. सहाव्या फ्लाइटमध्ये एकूण 143 प्रवासी सहभागी होते. तसंच या विमानातून दोन नेपाळी नागरिकही भारतात पोहोचले आहेत. केंद्रीय स्टील आणि ग्रामीण विकास राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी दिल्ली विमानतळावर या प्रवाशांचं स्वागत केलंय.
-
माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में चलाये जा रहे ऑपरेशन अजय के तहत आज तेलअवीव, इज़राइल से छठी उड़ान से वापिस भारत आये हमारे 143 देशवासियों का स्वागत किया।#जय_हिन्द 🇮🇳 pic.twitter.com/sqmnh80khr
— Faggan Singh Kulaste (@fskulaste) October 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में चलाये जा रहे ऑपरेशन अजय के तहत आज तेलअवीव, इज़राइल से छठी उड़ान से वापिस भारत आये हमारे 143 देशवासियों का स्वागत किया।#जय_हिन्द 🇮🇳 pic.twitter.com/sqmnh80khr
— Faggan Singh Kulaste (@fskulaste) October 22, 2023माननीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में चलाये जा रहे ऑपरेशन अजय के तहत आज तेलअवीव, इज़राइल से छठी उड़ान से वापिस भारत आये हमारे 143 देशवासियों का स्वागत किया।#जय_हिन्द 🇮🇳 pic.twitter.com/sqmnh80khr
— Faggan Singh Kulaste (@fskulaste) October 22, 2023
स्वागताची संधी मिळाल्यानं आनंद : सहाव्या विमानानं 143 भारतीय भारतात सुरक्षित परत आल्याबद्दल केंद्रीय मंत्र्यांनी आनंद व्यक्त केलाय. नागरिकांच्या स्वागतासाठी मी इथं आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. मला तुमचं स्वागत करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. 143 भारतीय संघर्षातून बचावले आहेत, ही दिलासादायक बाब आहे. भारतात येऊ इच्छिणाऱ्या भारतातील प्रत्येक नागरिकाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार वचनबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय.
- ऑपरेशन अजयचं सहावं विमान : इस्रायली शहरांवर 7 ऑक्टोबर रोजी हमास दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर भारतीय नागरिकांच्या परतीसाठी 12 ऑक्टोबर रोजी सुरू करण्यात आलेल्या 'ऑपरेशन अजय' अंतर्गत हे सहावं उड्डाण आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 143 लोक होते. यात दोन नेपाळी नागरिक आणि चार लहान मुलांचाही समावेश आहे.
-
Operation Ajay: MoS Faggan Singh Kulaste expresses happiness, relief as sixth flight arrives from Israel
— ANI Digital (@ani_digital) October 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Read @ANI Story | https://t.co/93oQciEq3H#OperationAjay #Israel #FagganSinghKulaste #NewDelhi pic.twitter.com/CfvyYyNH6H
">Operation Ajay: MoS Faggan Singh Kulaste expresses happiness, relief as sixth flight arrives from Israel
— ANI Digital (@ani_digital) October 22, 2023
Read @ANI Story | https://t.co/93oQciEq3H#OperationAjay #Israel #FagganSinghKulaste #NewDelhi pic.twitter.com/CfvyYyNH6HOperation Ajay: MoS Faggan Singh Kulaste expresses happiness, relief as sixth flight arrives from Israel
— ANI Digital (@ani_digital) October 22, 2023
Read @ANI Story | https://t.co/93oQciEq3H#OperationAjay #Israel #FagganSinghKulaste #NewDelhi pic.twitter.com/CfvyYyNH6H
आतापर्यंत पाच विमानं नवी दिल्लीत : 'ऑपरेशन अजय' अंतर्गत आतापर्यंत एकूण पाच विशेष विमानांनी लहान मुलांसह सुमारे 1200 प्रवाशांना तेल अवीवहून दिल्लीला आणलंय. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं गाझावरील प्रत्युत्तरादाखल केलेल्या हल्ल्यांमध्ये मुलांसह सुमारे 4,400 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलमध्ये किमान 1,400 इस्रायली आणि परदेशी नागरिकांचा मृत्यू झालाय.
- इस्रायलमध्ये 18000 भारतीय नागरिक : इस्रायलमध्ये सुमारे 18,000 भारतीय नागरिक कामासाठी किंवा अभ्यासासाठी राहत आहेत. यात सुमारे एक हजार विद्यार्थी, अनेक आयटी व्यावसायिक आणि हिरे व्यापारी देखील आहेत.
हेही वाचा :
- Operation Ajay : 'ऑपरेशन अजय' अंतर्गत इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना केलं 'एअरलिफ्ट', पहिलं विमान दिल्लीत दाखल
- Operation Ajay : इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं उचललं मोठं पाऊल
- Operation Ajay : इस्रायलवरुन दुसरं विमान धडकलं दिल्लीत; 235 भारतीयांना आणलं सुखरुप