श्रीनगर: उधमपूर येथून 18 जून 22 रोजी निघालेली कारगिल विजय ज्योत (Kargil victory flame)आज ड्रगमुल्ला येथे पोहोचली. त्यानंतर विजय ज्योत हाजीपीर ब्रिगेड वॉर मेमोरियल येथे आणण्यात आली, जिथे विविध लष्करी आणि नागरी मान्यवर, वीर नारी आणि शाळकरी मुलांनी पुष्पहार अर्पण केला.
या कार्यक्रमात सुमारे 500 अभिमानी नागरिकांचा सहभाग होता.
आर्मी गुडविल स्कूल (Army Goodwill School) त्रेहगाम, एजीएस वेन, रेहमत आलम प्रायव्हेट स्कूल आणि कुपवाडा शहरातील दोन नामांकित कराटे संस्थांच्या शाळकरी मुलांनी बाइक रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आकर्षण ठरले.
कारगिल विजयाची (Kargil victory flame) ज्योत आता तंगधर, केरन, मच्छल आणि दावरपर्यंत जाईल.