ETV Bharat / international

Biden Gift To Modi : 'AI भविष्य आहे', बायडन यांनी मोदींना भेट दिलेल्या टी-शर्टवर काय लिहिले आहे?, जाणून घ्या - जो बायडन यांची मोदींना भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेत ज्या प्रकारे सन्मान केला ते संपूर्ण जगाने पाहिले. यावेळी बायडन यांनी मोदींना एक खास टी-शर्ट भेट दिला आहे, ज्यावर AI लिहिले आहे. जाणून घ्या याद्वारे जगाला काय संदेश दिला गेला.

Biden Gift To Modi
जो बायडन यांची मोदींना भेट
author img

By

Published : Jun 24, 2023, 7:16 PM IST

Updated : Jun 24, 2023, 8:08 PM IST

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास टी-शर्ट भेट दिला आहे. या टी-शर्टवर 'द फ्युचर इज एआय - अमेरिका अँड इंडिया' असे लिहिले आहे. यूएस काँग्रेसच्या संयुक्त बैठकीत पंतप्रधान मोदींनी AI साठी ही नवीन व्याख्या दिली होती.

  • #WATCH | US President Joe Biden gifted a special T-Shirt to PM Narendra Modi with the PM's quote on AI.

    "In the past few years, there have been many advances in AI- Artificial Intelligence. At the same time, there has been even more momentous development in another AI-… pic.twitter.com/rx97EHZnMj

    — ANI (@ANI) June 23, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बायडन यांनी मोदींना टी-शर्ट भेट दिला : मोदी म्हणाले की, 'गेल्या सात वर्षांत बरेच काही बदलले आहे. तसेच भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री अधिक दृढ झाली आहे. AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) च्या युगात, आणखी एक AI (America-India) चा विकास दिसून आला आहे.' मोदींच्या या भाषणावर अमेरिकन खासदारांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा, अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह अनेकजण या कार्यक्रमात उपस्थित होते. या दरम्यान बायडन यांनी मोदींना हा टी-शर्ट भेट दिला.

Biden Gift To Modi
ज्यावेळी बायडन यांनी टी-शर्ट भेट दिले, त्यावेळी अनेक व्यावसायिकही उपस्थित होते

मोदींना या भेटवस्तू दिल्या : जो बायडन यांनी पंतप्रधान मोदींना हस्तनिर्मित, प्राचीन अमेरिकन बुक गॅलीही भेट दिली. तसेच एक विंटेज अमेरिकन कॅमेरा, अमेरिकन वन्यजीव छायाचित्रणाचे हार्डकव्हर पुस्तक आणि रॉबर्ट फ्रॉस्टच्या संग्रहित कवितांची स्वाक्षरी केलेली, प्रथम आवृत्तीची प्रत देखील भेट दिली. तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अमेरिकेच्या पहिल्या अधिकृत भेटीदरम्यान जो बायडन यांना 'दहा देणग्यांसह' हाताने तयार केलेला चंदनाचा बॉक्स भेट दिला. याशिवाय पंतप्रधान मोदींनी मेसर्स फेबर अँड फेबर लिमिटेड, लंडनने प्रकाशित केलेली आणि युनिव्हर्सिटी प्रेस ग्लासगो येथे छापलेली 'द टेन प्रिन्सिपल उपनिषद'ची प्रत देखील भेट दिली.

Biden Gift To Modi
मोदींनी दिलेली भेट बघताना बायडन

दहा देणग्यांमध्ये काय आहे? :

  1. गोदान : गोदान (गाईचे दान) साठी गायीच्या जागी, एका बॉक्समध्ये पश्चिम बंगालमधील कुशल कारागिरांनी नाजूकपणे हस्तकला केलेल्या चांदीच्या नारळाचा समावेश आहे.
  2. भूदान : जमिनीच्या जागी कर्नाटकातील म्हैसूर येथून आणलेल्या चंदनाचा सुगंधी तुकडा राष्ट्रपतींना भेट देण्यात आला.
  3. तीळदान : यामध्ये तामिळनाडूमधून आणलेल्या पांढरे तीळांचा समावेश आहे.
  4. हिरण्यदान : 24 कॅरेट शुद्ध आणि हॉलमार्क असलेले हे सोन्याचे नाणे राजस्थानातून आणले.
  5. अज्यदान : डब्ब्यात पंजाबमधून आणलेले तूप होते जे अज्यादान (लोणी दान) साठी दिले जाते.
  6. वस्त्रदान : कापडाचे दान. हे झारखंडमधून आणलेले, हाताने विणलेले रेशमी कापड होते.
  7. धान्यदान : उत्तराखंडमधून आणलेले तांदूळ धान्यदान (धान्य दान) साठी अर्पण केले गेले.
  8. गूळ : या दानासाठी महाराष्ट्रातून गूळ आणला होता.
  9. रौप्यदान : यासाठी 99.5 टक्के शुद्ध आणि हॉलमार्क असलेले चांदीचे नाणे आणण्यात आले हेते. ते राजस्थानच्या कारागिरांनी बनवले होते.
  10. लवण्यदान : मिठाच्या दानासाठी मीठ गुजरातमधून आणले होते.
  • भारत का हीरा ! 💎

    PM @NarendraModi ji gifts this beautiful eco-friendly lab-grown diamond, placed in Kashmir’s exquisite Papier mâché box to the U.S First Lady @FLOTUS 🇮🇳🇺🇸 pic.twitter.com/oWjFDbpAaR

    — Piyush Goyal (@PiyushGoyal) June 22, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जिल बायडन यांना डायमंड भेट : यावेळी पंतप्रधान मोदींनी फर्स्ट लेडी जिल बायडन यांना लॅबमध्ये बनवलेला 7.5 कॅरेटचा ग्रीन डायमंड भेट दिला. हा हिरा भारतात तयार झाला होता. हा हिरा सुरतच्या प्रयोगशाळेत बनवला आहे. हा जेमोलॉजिकल लॅब, IGI (इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट) द्वारे प्रमाणित 7.5 कॅरेट डायमंड आहे. 7.5 कॅरेट भारताच्या 75 वर्षांच्या स्वातंत्र्याचे आणि कायमस्वरूपी आंतरराष्ट्रीय संबंधांचे प्रतिनिधित्व करते. हा हिरा प्रगत तंत्रज्ञान वापरून तयार केला आहे, जो प्रति कॅरेट फक्त 0.028 ग्रॅम कार्बन उत्सर्जित करतो.

Biden Gift To Modi
जिल बायडन यांना डायमंड भेट

हेही वाचा :

  1. PM Modi US Visit : अमेरिकन उद्योगपतींना भारतात गुंतवणूक करण्याची मोदींची ऑफर
  2. Ginger Ale : मोदी दारू पीत नाहीत..तरीही बायडन यांनी ड्रिंकचा ग्लास दिला, जाणून घ्या
  3. PM Modi US Visit : मोदींच्या अमेरिका भेटीतून भारताला काय मिळाले? जाणून घ्या

Last Updated : Jun 24, 2023, 8:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.