ETV Bharat / international

Janhvi Kandula Death Case : भारतानं अमेरिकेला सुनावलं, जान्हवी कंडुला मृत्यू प्रकरणी कारवाईची मागणी - भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू

Janhvi Kandula death case : जान्हवी कंडुलाच्या मृत्यू प्रकरणी भारतानं अमेरिकेकडं दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केलीय. जानेवारी महिन्यात अमेरिकन पोलिसांच्या वाहनानं चिरडून जान्हवी कंडुलाचा मृत्यू झाला होता.

Janhvi Kandula Death Case
Janhvi Kandula Death Case
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 14, 2023, 5:06 PM IST

न्यूयॉर्क Janhvi Kandula Death Case : अमेरिकेत पोलिसांच्या गाडीनं दिलेल्या धडकेत एका भारतीय विद्यार्थीनीच्या मृत्यूप्रकरणी भारतानं अमेरिकेला चांगलंच सुनावलं आहे. विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी विनोद करताना दिसत होते. त्यामुळं या व्हिडिओ फुटेजची व्यापक चौकशी करण्याची मागणी भारतानं अमेरिकेकडं केलीय.

  • Recent reports including in media of the handling of Ms Jaahnavi Kandula’s death in a road accident in Seattle in January are deeply troubling. We have taken up the matter strongly with local authorities in Seattle & Washington State as well as senior officials in Washington DC

    — India in SF (@CGISFO) September 13, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी भारत सरकारला या प्रकरणी जलद तपास तसंच पोलीस अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय. साउथ लेक युनियनमधील नॉर्थईस्टर्न विद्यापीठामध्ये 23 वर्षीय विद्यार्थिनी जान्हवी कंडुलाचा 23 जानेवारी रोजी मृत्यू झाला होता. डेक्सटर अव्हेन्यू नॉर्थ थॉमस स्ट्रीटजवळ ती पायी चालत असताना सिएटल पोलिसांच्या वाहनानं तिला धडक दिली होती.

भारतानं घेतली कठोर भूमिका : अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंग संधू यांनी हा मुद्दा वॉशिंग्टनमध्ये मांडला. कंडुलाच्या हत्येवर आणि वॉशिंग्टन राज्यातील सिएटल येथील पोलीस अधिकाऱ्याच्या अत्यंत असंवेदनशील वृत्तीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर अमेरिकन सरकारनं त्यांची दखल घेतली.

"आम्ही हे प्रकरण सिएटल, वॉशिंग्टन राज्यातील स्थानिक अधिकारी तसंच वॉशिंग्टन, डीसीमधील वरिष्ठ अधिकार्‍यांना या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांवर सखोल तपास आणि कारवाईसाठी पाठवले आहे," - दूतावासाची सोशल मीडिया पोस्ट

कायदेशीर कारवाईचं आश्वासन : भारतीय अमेरिकन काँग्रेसचे सदस्य रो खन्ना म्हणाले, "जान्हवी कंडुला भारतातून पदवीच्या कामासाठी अमेरिकेत आली होती. कंडुला रस्ता ओलांडत असताना एका वेगवान पोलिसांच्या कारनं तिला धडक दिली. या घटनेबद्दल अमेरिकेत राहणाऱ्या भारताच्या नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. बायडन प्रशासनानं भारत सरकारला या घटनेची त्वरीत चौकशी करून दोषी पोलीस अधिकाऱ्यांना न्याय देण्याचं आश्वासन दिलं आहे.

घटनेचा गांभीर्यानं तपास करणार : प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी भारत सरकारला संपूर्ण घटनेचा गांभीर्यानं तपास करणार असल्याचं म्हटलं आहे. या घटनेमुळं अमेरिकेत राहणाऱ्या विद्यार्थांचा सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय वाणिज्य दूतावासानं बुधवारी कंडुलाच्या मृत्यूच्या तपासाची पद्धत "अत्यंत त्रासदायक" असल्याचं म्हटलं आहे. भारतीय-अमेरिकन काँग्रेस वुमनच्या प्रमिला जयपाल म्हणाल्या, "हे भयावह आहे. मला आशा आहे की जान्हवी कंडुलाच्या कुटुंबाला न्याय मिळेल. तिच्या मृत्यू प्रकणात सहभागी असलेल्यांना शिक्षा केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे."

हेही वाचा -

  1. Morocco Earthquake : मोरोक्कोच्या भूकंपातील मृतांची संख्या २००० पार, ३ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
  2. Morocco Earthquake : मोरोक्कोमधील शक्तिशाली भूकंपात 1 हजार 37 नागरिकांचा मृत्यू
  3. G20 Summit : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नीसह भारतात दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.