ETV Bharat / international

Israel Palestine Conflict : 100 लढाऊ विमानांचा गाझावर हल्ला; कारवाई तीव्र करण्याचा इस्रायली सैन्यानं दिला होता इशारा - 100 fighter jets attack Gaza

Israel Palestine Conflict : संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं गाझामध्ये 'मानवतावादी युद्धविराम' पुकारलाय. तर दुसरीकडं, इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी आमचं सैन्य गाझामध्ये कारवाई आणखी तीव्र करेल असा इशारा दिलाय.

Israel Palestine Conflict
Israel Palestine Conflict
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 28, 2023, 1:00 PM IST

जेरुसलेम Israel Palestine Conflict : इस्रायली सैन्यानं लवकरच आपल्या भूदलासह कारवाई सुरू करणार असल्याची घोषणा केली आहे. हमासविरुद्ध युद्ध सुरू झाल्यानंतर दुसऱ्यांदा इस्रायली सैन्यानं ही घोषणा केलीय. दरम्यान, पॅलेस्टाईनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं शनिवारी गाझा पट्टीवरील इस्रायलचं युद्ध अधिक तीव्र आणि धोकादायक बनण्याची शक्यता लक्षात घेऊन या प्रकरणात जगभरातील देशांनी त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केलीय. त्यांनी जगभरातील देशांना गाझामधील वेगवान घडामोडींवर कारवाई करण्याचं आवाहन केलंय.

100 लढाऊ विमानांनी गाझावर बॉम्बहल्ला : गेल्या 21 दिवसापासून हमास आणि इस्त्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. त्यांच्यातील युद्ध दिवसेंदिवस वाढत आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायल बदला घेत, गाझा पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, इस्रायली सैन्यानं गाझामध्ये पुन्हा एकदा हवाई हल्ले तीव्र केलेत. इस्रायली सैन्यानं 100 लढाऊ विमानांनी गाझावर बॉम्बहल्ला केलाय.

गाझातील बहुतांश भागात इंटरनेट सेवा विस्कळीत : इस्रायसनं केलेल्या हल्ल्यामुळं गाझात बहुतांश भागात इंटरनेट विस्कळीत झालंय. इस्रायली सैन्य गाझा पट्टीतील हमासच्या स्थानांवर बॉम्बफेक करतंय. इस्रायली सैन्यानं गाझा पट्टीमध्ये गेल्या काही तासांत हवाई हल्ले केल्याचं इस्रायली सैन्यचे प्रवक्ते डॅनियल हगारी यांनी सांगितलंय.

युद्धामुळं अनेकांचा मृत्यू : गाझामध्ये आतापर्यंत 7000 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर 19 हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येतंय. विशेष म्हणजे मृतांमध्ये 3000 हून अधिक मुलांचा समावेश आहे. यासोबतच इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 1400 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. इस्रायल-हमास युद्ध ७ ऑक्टोबर रोजी सुरू झालं होतं. हमासनं अचानक इस्रायलवर हल्ला केला होता, यानंतर इस्रायलनंही हमासला प्रत्युत्तर दिलं आणि हे युद्ध अजूनही सुरुच आहे.

हेही वाचा :

  1. Israel Hamas War Update : इंधनाचा तुटवडा, इस्रायली बॉम्बफेकीमुळं गाझामध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली; इस्रायल हमास युद्धाचे अपडेट वाचा एका क्लिकवर
  2. Operation Ajay : इस्रायलहून भारतीयांना घेऊन सहावं विमान दिल्लीत पोहोचले! केंद्रीय राज्यमंत्री फग्गनसिंग कुलस्ते यांनी प्रवाशांचं केल स्वागत
  3. Gaza West Bank Relation : युद्धात वारंवार उल्लेख होणाऱ्या गाझा, वेस्ट बँक आणि पॅलेस्टाईन यांच्यात संबंध काय, जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.