ETV Bharat / international

Israel Hamas Conflict :इस्रायल-हमास संघर्षाबाबत आज UNSC बैठक, भारत अमेरिकेकडून निषेध

Israel Hamas Conflict : मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 300 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी, इस्रायलनं प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात 200 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Israel Hamas Conflict
Israel Hamas Conflict
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 8, 2023, 10:35 AM IST

Updated : Oct 8, 2023, 12:01 PM IST

वाशिंग्टन (अमेरिका) Israel Hamas Conflict : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला आहे. शनिवारी सकाळी, हमासनं अचानक गाझामधून इस्रायली शहरांवर सुमारे 5,000 रॉकेट डागले. त्यामुळं युद्धाची भीती पाहता रविवारी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर बोलून सर्व मदतीचं आश्वासन दिलंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हमासच्या हल्ल्यात आतापर्यंत 300 हून अधिक इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, इस्रायलच्या प्रत्युत्तरादाखल हल्ल्यात 200 हून अधिक पॅलेस्टिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध : संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी इस्रायलवरील हल्ल्याचा निषेध केला आहे. व्यापक संघर्ष टाळण्यासाठी सर्व राजनैतिक आवाहन केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन म्हणाले की, या संकटाच्या काळात मला जगाला, दहशतवाद्यांना सांगायचं, की अमेरिका इस्रायलच्या पाठीशी आहे. मी आज सकाळी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी बोललो आहे. मी त्यांना सांगितलं की अमेरिका इस्रायलच्या लोकांच्या पाठीशी आहे. युद्धात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. ज्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल आम्हाला दु:ख आहे. जखमी लवकरात लवकर बरे व्हावे अशी आमची इच्छा आहे.

ब्रिटन, जर्मनी या हल्ल्यामुळं हादरले : ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्लीव्हर्ले यांनी हमासच्या हल्ल्याचा निषेध केला. त्यांनी इस्रायलच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराला नेहमीच पाठिंबा असल्याचं सांगितलंय. जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ म्हणाले की, इस्रायलवरील हल्ल्याच्या वृत्तानं त्यांना धक्का बसला आहे.

आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन : कतारनं इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला आहे. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे, की आंतरराष्ट्रीय समुदायानं इस्रायलला आंतरराष्ट्रीय कायद्याचं घोर उल्लंघन केल्याप्रकरणी थांबविण्यास भाग पाडण्यासाठी त्वरित कारवाई करणं आवश्यक आहे. कुवैतच्या परराष्ट्र मंत्रालयानं आंतरराष्ट्रीय समुदायाला इस्रायलचा कब्जा, वसाहतीचा विस्तार थांबवण्याचं आवाहन केलं आहे. त्याचवेळी इराण समर्थित दहशतवादी संघटना हिजबुल्लाहनं हमासच्या हल्ल्याचं समर्थन केलंय.

सौदी अरेबियाचं संयम ठेवण्याचं आवाहन : सौदी अरेबियानं दोन्ही बाजूंमधील तणाव, नागरिकांचे संरक्षण, करण्याचं आवाहन केलंय. मंत्रालयानं म्हटले आहे की, “आम्ही सततचा कब्जा, पॅलेस्टिनींना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवल्यामुळं परिस्थितीचा स्फोट होण्याच्या धोक्यांबद्दल वारंवार चेतावणी दिली आहे.”

हमासनं हल्ल्याची तीन कारणे दिली : हमासनं म्हटले की, जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीत इस्त्रायलनं केलेल्या अपवित्रतेचा हा बदला आहे. इस्रायली पोलिसांनी एप्रिल 2023 मध्ये अल-अक्सा मशिदीवर ग्रेनेड फेकलं होतं. इस्रायलचे सैन्य हमासच्या ठिकाणावर सातत्यानं हल्लं करत आहे. इस्रायली सैन्य आमच्या महिलांवर हल्ले करत आहे. हमासचं प्रवक्ते गाझी हमद यांनी अरब देशांना इस्रायलशी असलेले सर्व संबंध तोडण्याचं आवाहन केलं आहे.

हेही वाचा -

  1. Gaza ISrael Conflict : चित्रपट महोत्सवास गेलेली अभिनेत्री नुसरत भरूचा अडकली इस्राईलमध्ये, संपर्क होत नसल्यानं खळबळ
  2. Israel Hamas Conflict : हमासच्या रॉकेट हल्ल्याला इस्रायलचं प्रत्युत्तर, 230 हून अधिक पॅलेस्टिनी ठार

Last Updated : Oct 8, 2023, 12:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.