लंडन - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू लंडनमध्ये (India President Droupadi Murmu in London) आज सकाळी दाखल झाल्या आहेत. राणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहणार (Queen Elizabeth Funeral Monday) आहेत. सोमवारी राणी एलिझाबेथ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी १२ सप्टेंबर रोजी दिल्लीतील ब्रिटीश उच्चायुक्तांना भेट देऊन शोक व्यक्त केला होता. राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे 8 सप्टेंबर रोजी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले होते. त्यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (President Droupadi Murmu attend Queen Elizabeth Funeral)
वेस्टमिन्स्टर अॅबे येथे होणार अंत्यसंस्कार - 8 सप्टेंबर रोजी राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन झाले होते. राष्ट्रपती मुर्मू, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राणींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला होता. अंत्यसंस्कार वेस्टमिन्स्टर अॅबे येथे सोमवारी होणार आहेत, ज्यात विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह सुमारे 2,000 पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. महाराणी एलिझाबेथ द्वितीय गेल्या वर्षापासून एपिसोडिक मोबिलिटीच्या समस्येने त्रस्त होत्या. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर्वाधिक काळ राज्य केले आहे. जवळपास 70 वर्षे त्या ब्रिटनच्या राणी होत्या. (Queen Elizabeth II Died: Britain's Queen Elizabeth II died at the age of 96, the royal family informed)
सोमवारी होणार अंत्यसंस्कार - चर्चमध्ये प्रार्थनेनंतर राणीचा मृतदेह असलेली शवपेटी लंडनच्या मध्यभागी घोडागाडीतून नेली जाईल. राणीला तिचा पती प्रिन्स फिलिप यांच्या शेजारी विंडसर येथे दफन केले जाणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, महाराणी एलिझाबेथ II च्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत भारत-ब्रिटन संबंध विकसित आणि घनिष्ट झाले आहेत.
Queen Elizabeth II राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे शासकीय अंत्यसंस्कार वेस्टमिन्स्टर अॅबे येथे सोमवार 19 सप्टेंबर रोजी होणार असल्याचे बकिंघम पॅलेसने जाहीर केले आहे. राणीचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या चार दिवस आधी वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात आले. जेणेकरून जनतेला अंतिम श्रद्धांजली वाहण्याची अनेकांना संधी मिळेल. बकिंघम पॅलेसने एका तपशीलवार निवेदनात सांगितले की, राणीची शवपेटी सुरुवातीला बालमोरल कॅसलच्या बॉलरूममध्ये ठेवण्यात आली होती. त्यानंतर एलिझाबेथ यांचे पार्थिव मंगळवारपर्यंत शवपेटीमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर बुधवारपासून शवपेटी लंडनमधील बकिंगहॅम पॅलेस येथील वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये ठेवण्यात आली आहे. यानंतर राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्यावर 19 सप्टेंबर रोजी लंडनमधील वेस्टमिन्स्टर अॅबे येथे सकाळी 11 वाजता शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.