हैदराबाद- जगातील कोरोनाबाधित रुग्णसंख्येने दोन कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात 2 कोटी 16 हजार 302 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. आत्तापर्यंत कोरोनामुळे संपूर्ण जगात 7 लाख 33 हजार 592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1 कोटी 28 लाख 92 हजार 74 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
अमेरिकेत 51 लाख 99 हजार 431 रुग्णांची नोंद झाली. त्या पाठोपाठ ब्राझीलमध्ये 30 लाख 35 हजार 582 रुग्ण आढळले आहेत. भारत जगात तिसऱ्या स्थानी असून भारतात 22 लाख 14 हजार 137 रुग्णांची नोंद झाली. भारतापाठोपाठ रशिया आणि दक्षिण आफ्रिकेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळते.
आफ्रिका खंडामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 5 लाखांचा टप्पा ओलांडला, अशी माहिती द आफ्रिका सेंटर फॉर डिसिझ कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन या संस्थेने दिली. दक्षिण आफ्रिकेत 5 लाख 59 हजार 859 रुग्ण आढळले तर 10 हजार 408 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये 1 हजार नवे रुग्ण आढळले आहेत. जून महिन्यानंतर एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण सापडण्याची पहिलीच वेळ आहे.