व्हॅटिकन - माजी पोप एमेरिटस बेनेडिक्ट सोळावे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी निधन झाले आहे. व्हॅटिकनमधील संबंधित सूत्रांनी ही माहिती दिली आहे. धर्मनिरपेक्ष युरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचे पुनर्जागरण करण्याचा प्रयत्न करणारे जर्मन धर्मशास्त्रज्ञ, परंतु राजीनामा देणारे 600 वर्षांतील पहिले पोप म्हणून कायमचे स्मरणात राहतील, असे पोप एमेरिटस बेनेडिक्ट XVI यांचे शनिवारी निधन झाले. बेनेडिक्ट यांची प्रकृती काही वर्ष बरी नव्हती. वयही वाढते असल्याने त्यांची प्रकृती आणखी बिघडत चालली. नुकतेच पोप फ्रान्सिस यांनी बेनेडिक्ट यांची प्रकृती सुधारावी यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले होते. त्यांचा जन्म जर्मनीत झाला होता.
2005 मध्ये वयाच्या 78 व्या वर्षी त्यांची पोप म्हणून निवड झाली. पोपपदी निवड होणारे ते सगळ्यात वयस्क धर्मगुरु होते. त्यांच्या कार्यकाळात कॅथलिक चर्चविरुद्ध अनेक आरोप झाले. धर्मगुरुंकडून सुमारे दशकभर लहान मुलांचं लैंगिक शोषण झाल्याचे आरोपही झाले. 1977 ते 1982 या कालावधीत म्युनिकचे आर्चबिशप असताना लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची प्रकरणे हाताळताना चुका झाल्याचे बेनेडिक्ट यांनी मान्य केले होते. 2013 मध्ये प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव 85 वर्षीय पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी पोपपदाचा राजीनामा दिला होता. पदावर असताना राजीनामा देणारे बेनेडिक्ट हे ६०० वर्षांच्या पोपपदाच्या इतिहासातील पहिलेच पोप ठरले होते. पोप जॉन पॉल यांच्या मृत्यूनंतर २००५ मध्ये बेनेडिक्ट यांची पोपपदी निवड झाली होती. साधारणपणे पोपच्या मृत्यूनंतर नव्या पोपची निवड करण्याचा रिवाज आहे. मात्र, बेनेडिक्ट यांच्या अनपेक्षित घोषणेमुळे नवे पोप निवडले गेले.
व्हॅटिकनचे प्रवक्ते मॅटेओ ब्रुनी यांनी शनिवारी सकाळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. 'मी दुःखाने सांगतो की पोप एमेरिटस बेनेडिक्ट सोळावा यांचे आज व्हॅटिकनमधील मेटर एक्लेसिया मठात ९-३४ वाजता निधन झाले.' पोप बेनिडिक्ट यांची कारकीर्द चांगलीच गाजली होती. त्यांनी काही गोष्टीत निर्णायक भूमिका घेतला. बर्याचदा विवादास्पद मार्गाने त्यांनी युरोपला ख्रिश्चन वारशाची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कॅथोलिक चर्चला एक पुराणमतवादी, परंपरा-विचारांच्या मार्गावर पुन्हा नेण्याचा प्रयत्न केला तसेच पुरोगाम्यांना अनेकदा झिडकारले. त्यांनी जुने लॅटिन मास साजरे करण्यावरील निर्बंध शिथिल केले आणि बदलत्या जगाला तोंड देताना चर्चने आपल्या शिकवणी आणि परंपरांवर खरे राहावे असा आग्रह धरला.
पोपनी अमेरिकन नन्सवर कडक कारवाई केली. बेनेडिक्ट यांची शैली जॉन पॉल किंवा फ्रान्सिस यांच्यापेक्षा वेगळी होती. बेनेडिक्ट एक शिक्षक, धर्मशास्त्रज्ञ आणि मूळचे शैक्षणिक तज्ज्ञ होते. शांत असूनही गधी उग्र होत मात्र ते मनाने विचारशील होते. ते अभ्यासू होते. त्यांच्या घरी त्यांची मोठी लायब्ररी होती. पुस्तके हीच आपली मार्गदर्शक आहेत असे ते मानत होते.