सॅन अँटोनियो : अमेरिकेच्या नैऋत्य टेक्सासमधील सॅन अँटोनियो येथे सोमवारी एका ट्रॅक्टर-ट्रेलरमध्ये किमान ४६ लोक मृतावस्थेत आढळून ( bodies found at Texas ) आले आणि इतर १६ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना परप्रांतीयांच्या तस्करीशी संबंधित असल्याचा संशय ( migrant smuggling attempt in South Texas ) आहे. अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
पोलीस प्रमुख विल्यम मॅकमॅनस यांनी सांगितले की, घटनास्थळी असलेल्या एका शहर कर्मचाऱ्याला संध्याकाळी 6 वाजता मदतीसाठी ओरडणे ऐकून परिस्थितीची कल्पना आली. अधिकारी ट्रॅक्टर-ट्रेलरजवळ आला तेव्हा त्याला बाहेर जमिनीवर एक मृतदेह दिसला.
अग्निशमन विभागाचे प्रमुख चार्ल्स हूड यांनी सांगितले की, उष्णतेमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या 16 जणांपैकी 12 प्रौढ आणि चार मुले आहेत. रुग्णांचे शरीर उष्ण पडलेले होते आणि ट्रेलरमध्ये अजिबात पाणी नव्हते. मॅकमॅनस म्हणाले की, या प्रकरणात तीन लोकांना ताब्यात घेण्यात आले होते, परंतु ते मानवी तस्करीशी संबंधित होते की नाही हे स्पष्ट झाले नाही.
यापूर्वीही घडला प्रकार : गेल्या काही दशकांतील ही सर्वात प्राणघातक शोकांतिका असू शकते, हजारो लोक मेक्सिकोमधून अमेरिकेची सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत आहेत. 2017 मध्ये, सॅन अँटोनियो येथील वॉलमार्ट येथे पार्क केलेल्या ट्रकमध्ये अडकल्याने 10 स्थलांतरितांचा मृत्यू झाला. 2003 मध्ये सॅन अँटोनियोच्या आग्नेयेला एका ट्रकमध्ये 19 स्थलांतरित सापडले होते. असे मानले जाते की हे लोक मेक्सिकोच्या बाजूने अमेरिकेत घुसले होते.
हेही वाचा : वॉशिंग्टन डीसीमध्ये गोळीबारात तरुण ठार, पोलीस अधिकाऱ्यासह तीन जण जखमी