ETV Bharat / international

China Builds New Dam: चीनचा नवा डाव.. भारताच्या सीमेजवळच बांधत आहे नवे धरण.. सॅटेलाइट चित्र आले समोर

author img

By

Published : Jan 22, 2023, 5:19 PM IST

तिबेटमध्ये भारताच्या सीमेजवळ चीन आता वेगाने नवीन धरण बांधत आहे. इंटेल लॅबचे विश्लेषक डॅमियन सायमन यांनी ट्विट करून चीनच्या या कृत्याचा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, चीन तिबेटमधील माब्जा झांगबो नदीच्या काठावर नवीन धरण बांधत आहे, ही केवळ भारतासाठीच नाही तर नेपाळसाठीही चिंतेची बाब आहे.

China Builds New Dam: CHINA BUILDS NEW DAM ON MABJA ZANGBO RIVER IN TIBET NEAR INDIAN BORDER
चीनचा नवा डाव.. भारताच्या सीमेजवळच बांधत आहे नवे धरण.. सॅटेलाइट चित्र आले समोर

डेहराडून (उत्तराखंड): कुरापतखोर शेजारी देश चीन आपल्या भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात सतत बांधकामे करत आहे. आपल्या कुटील कारवायांनी भारताला सतत अडचणीत आणण्याचा प्रयत्न चीन करत आहे. इंटेल लॅबचे विश्लेषक डॅमियन सायमन यांनी ट्विट करून चीनच्या या कृत्याचा खुलासा केला आहे. आता चीन तिबेटमध्ये भारताच्या सीमेजवळ वेगाने नवीन धरण बांधत असल्याचे सॅटेलाईट चित्रांवरून स्पष्ट झाले आहे.

भारत, नेपाळसाठी चिंतेची बाब: तिबेटमधील माब्जा झांगबो नदीच्या काठावर चीन नवीन धरण बांधत आहे. जी केवळ भारतासाठीच नाही तर नेपाळसाठीही चिंतेची बाब आहे. या धरणाच्या बांधकामाचे सॅटेलाइट चित्रही समोर आले आहे. हे नवीन धरण ट्राय जंक्शनच्या उत्तरेस १६ किमी अंतरावर आहे आणि उत्तराखंडच्या कालापानी प्रदेशाच्या समोर स्थित आहे. माब्जा झांगबो नदी तिबेटच्या नागरी काउंटीमध्ये येते. जी नेपाळमार्गे भारतातील घाघरा नदीत येते आणि नंतर गंगा नदीला मिळते.

  • Since early 2021, China has been constructing a dam on the Mabja Zangbo river just a few kilometers north of the trijunction border with India & Nepal, while the structure isn't complete, the project will raise concerns regarding China's future control on water in the region pic.twitter.com/XH5xSWirMk

    — Damien Symon (@detresfa_) January 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

उपग्रह चित्र ट्विटरवर केले शेअर: इंटेल लॅबमधील भू-स्थानिक बुद्धिमत्ता संशोधक डॅमियन सायमन यांनी एका ट्विटमध्ये उपग्रह चित्र शेअर केले आणि सांगितले की, येथे धरणाचे बांधकाम सुरू आहे. मे २०२१ पासून हे काम सुरू असल्याचे चित्रांमध्ये दिसून येते. ट्विटमध्ये म्हटले आहे की, 2021 पासून चीन सीमेवरील ट्राय जंक्शनपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर असलेल्या माब्जा झांगबो नदीवर धरण बांधत आहे.

भविष्यात चीनचे नियंत्रण होणार मजबूत: हे बांधकाम अद्याप पूर्ण झाले नसले तरी या प्रकल्पामुळे भविष्यात येथे चीनचे नियंत्रण मजबूत होणार आहे. ब्रह्मपुत्रा नदी तिबेटमधील यारलुंग झांगबो म्हणून ओळखली जाते, ती तिबेटमधील हिमाचल प्रदेशात उगम पावते आणि भारतातील अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते. येथून आसाममार्गे बांगलादेशात जाऊन बंगालच्या उपसागरात येते.

सैन्य तैनात करण्याची शक्यता: 2021 मध्ये चीनने जाहीर केले होते की, ते यारलांग झांगबो येथे एक महाकाय धरण बांधणार आहे. येथे चीन 70 GW वीज निर्मिती करेल. हे चीनमधील जॉर्जेस धरणापेक्षा तिप्पट मोठे धारण आहे. क्षमतेच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प येथे उभारण्यात येत आहे. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर चीन येथे आपले सैन्य तैनात करेल हे नाकारता येत नाही. चीन नदीजवळील सीमेजवळील या धरणाचा वापर करून वादग्रस्त भागात आपला दावा बळकट करू शकतो.

हेही वाचा: China Tiangong space station चीन चंद्रावर कब्जा करण्याच्या तयारीत असल्याने अमेरिका चिंतेत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.