ETV Bharat / international

Bill Gates New Girlfriend: ६७ वर्षीय बिल गेट्स पुन्हा रिलेशनशिपमध्ये.. जाणून घ्या कोण आहे नवी 'गर्लफ्रेंड', वर्षभरापासून करताहेत 'डेट' - बिल गेट्स यांचा झालाय घटस्फोट

प्रेम हे कोणत्याही वयात होऊ शकत. याचंच उदाहरण म्हणजे मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स सध्या त्यांच्या नात्यामुळे चर्चेत आहेत. बिल गेट्स रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. चला जाणून घेऊया कोण आहे त्यांची नवीन गर्लफ्रेंड.

Bill Gates relationship with New Girlfriend Paula Hurd
६७ वर्षीय बिल गेट्स पुन्हा रिलेशनशिपमध्ये.. जाणून घ्या कोण आहे नवी 'गर्लफ्रेंड', वर्षभरापासून करताहेत 'डेट'
author img

By

Published : Feb 9, 2023, 4:23 PM IST

नवी दिल्ली : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स सध्या आपल्या नात्यामुळे चर्चेत आहेत. असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ते त्यांची नवीन गर्लफ्रेंड पाउला हर्डसोबत दिसत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही एक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहेत. अशा प्रकारे दोघेही अनेक प्रसंगात एकत्र स्पॉट झाले आहेत. बिल गेट्स 67 वर्षांचे आहेत, तर पॉला हर्ड 60 वर्षांच्या आहेत.

पॉला हर्ड कोण आहेत?: पॉला हर्ड या ओरॅकल कंपनीचे दिवंगत सीईओ मार्क हर्ड यांच्या पत्नी आहेत. मार्क हर्ड यांचे २०१९ मध्ये निधन झाले. त्यांना त्यांच्या माजी दिवंगत पतीसोबत दोन मुली आहेत. कॅथरीन आणि केली. पॉला हर्डच्या लिंक्डइन बायोमध्ये ती नॅशनल कॅश रजिस्टर नावाच्या सॉफ्टवेअर कंपनीत काम करते असं आहे. ज्या अंतर्गत त्या खास प्रसंगी कार्यक्रम आयोजित करत असतात. याशिवाय त्यांनी ऑस्टिनच्या टेक्सास विद्यापीठातून बिझनेस अडमिनिस्ट्रेशनची पदवी घेतली आहे. पॉला हर्डबद्दल जाणून घेतल्यानंतर, गेट्सची माजी पत्नी मेलिंडा गेट्सबद्दल जाणून घेऊयात.

बिल गेट्स यांचा झालाय घटस्फोट: बिल गेट्स आणि त्यांची माजी पत्नी मिलिंडा गेट्स यांच्यात घटस्फोट ऑगस्ट 2021 मध्ये झाला होता. या घटस्फोटामुळे दोघांचे (बिल गेट्स आणि मिलिंद) 27 वर्षांचे वैवाहिक नाते तुटले. घटस्फोट होऊन आता दोन वर्षांनी पॉला हर्डसोबतच्या त्याच्या नात्याच्या बातम्या येत आहेत. मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल आणि मेलिंडा यांची कंपनीतच भेट झाली होती. मेलिंडा यांनी 1987 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये प्रोडक्ट मॅनेजर म्हणून काम केले, जेव्हा ते दोघे भेटले. काही वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी 1994 मध्ये हवाईमध्ये लग्न केले. या जोडप्याला तीन मुले आहेत.

अनेक दिवसांपासून करताहेत 'डेट': बिल गेट्स आणि पॉला हर्ड अनेकदा एकत्र दिसले होते.गेल्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात बिल गेट्स आणि पॉला हर्ड दोघेही ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये एकत्र दिसले होते. याआधी मार्च २०२२ मध्ये इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेच्या WTA सेमीफायनल मॅचमध्ये दोघांचा एकत्र बसलेला फोटोही समोर आला होता. दोघांनीही आपले नाते लोकांच्या नजरेपासून दूर ठेवले आहे. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, पॉला गेल्या महिन्यात बिल गेट्ससोबत सिडनीलाही गेली होती, जिथे तिने पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांची भेट घेतली होती.

हेही वाचा: Forbes Billionaire List: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अर्नॉल्ट आणि लॅरी एलिसन करतात तरी काय? घ्या जाणून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.