ETV Bharat / international

Rupert Murdoch Marriage : उद्योगपती रुपर्ट मर्डोक वयाच्या 92 व्या वर्षी पाचव्यांदा चढणार बोहल्यावर! - रुपर्ट मर्डोक

ऑस्ट्रेलियन - अमेरिकन उद्योगपती आणि मीडिया क्षेत्रातील मोठे नाव रुपर्ट मर्डोक पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहेत. ते 92 वर्षांचे आहेत. येणाऱ्या उन्हाळ्यात ते एका माजी महिला पोलीस अधिकाऱ्याशी लग्न करणार आहेत.

Rupert Murdoch
रुपर्ट मर्डोक
author img

By

Published : Mar 21, 2023, 10:13 AM IST

न्यूयॉर्क : मीडिया टायकून रुपर्ट मर्डोक यांनी सोमवारी जाहीर केले की, ते वयाच्या 92 व्या वर्षी पाचव्यांदा लग्न करणार आहेत. या अब्जाधीश उद्योगपतीने 66 वर्षीय माजी पोलीस महिला अ‍ॅन लेस्ली स्मिथ यांच्याशी आपल्या साखरपुड्याची घोषणा केली आहे. सप्टेंबरमध्ये कॅलिफोर्नियातील एका कार्यक्रमात या दोघांची भेट झाली होती. मर्डोक यांनी सांगितले की, त्यांनी स्मिथला 'सेंट पॅट्रिक डे' च्या दिवशी प्रपोज केले. मर्डोक यांनी यावेळी सांगितले की, 'मला आता प्रेमाची भीती वाटत होती, पण मला माहित आहे की हे माझे शेवटचे प्रेम आहे. हे चांगले राहिल अशी माझी अपेक्षा आहे. मी आनंदी आहे.'

उन्हाळ्यात होणार लग्न : गेल्या वर्षी ते त्यांची चौथी पत्नी जेरी हॉलपासून वेगळे झाले होते. उन्हाळ्यात त्यांचे लग्न होणार आहे. मर्डोक यांनी यापूर्वी ऑस्ट्रेलियन फ्लाइट अटेंडंट पॅट्रिशिया बुकर, स्कॉटिश वंशाच्या पत्रकार अण्णा मान आणि चिनी वंशाच्या उद्योजक वेंडी डेंग यांच्याशी लग्न केले होते. तर स्मिथ यांचे दिवंगत पती चेस्टर स्मिथ हे गायक आणि रेडिओ व टीव्ही एक्झिक्युटिव्ह होते. त्यांनी वृत्तपत्राला सांगितले की, 'आम्हा दोघांसाठी ही दैवी देणगी आहे. आम्ही गेल्या सप्टेंबरमध्ये भेटलो. मी १४ वर्षांची विधवा आहे. रुपर्टप्रमाणेच माझे पतीही व्यापारी होते. म्हणूनच मी रुपर्टशी कनेक्ट झाले. आमचे बरेच मते समान आहेत.

मर्डोक यांना सहा मुले आहेत : मर्डोक यांना मागील तीन विवाहांमधून सहा मुले आहेत. यावेळी ते म्हणाले की, 'आम्ही दोघेही आमच्या आयुष्याचा दुसरा अर्धा भाग एकत्र घालवण्यास उत्सुक आहोत.' मर्डोकच्या व्यावसायिक साम्राज्यात अमेरिकेतील 'फॉक्स न्यूज' आणि ब्रिटनमधील टॅब्लॉइड 'द सन' यांचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, ऑस्ट्रेलियन - अमेरिकन उद्योगपती आणि मीडियातील मोठे प्रस्थ असलेल्या रुपर्ट मर्डोक यांनी गेल्या वर्षी जूनमध्ये मॉडेल व अभिनेत्री जेरी हॉलला घटस्फोट दिला. या दोघांमध्ये जवळपास सहा वर्षे लग्नाचे बंधन होते.

हेही वाचा : Mehul Choksi News : भारताला धक्का, इंटरपोलकडून कर्जबुडव्या मेहुल चोक्सीला जगभरात कुठेही फिरण्याची मुभा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.