ETV Bharat / international

अल झवाहिरीच्या खात्म्यासाठी सीआयए-बिडेन यांची चार महिन्यांपासून सुरू होती तयारी

अल-कायदाचा म्होरक्या आणि जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या अयमान अल-जवाहिरीला अमेरिकेने ठार केले आहे. संस्थापक ओसामा बिन लादेनसोबत 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. वाचा सीआयए किती आणि कशी नजर त्यांच्यावर ठेवत होती.

चार महिन्यांपासून सुरू होती तयारी
चार महिन्यांपासून सुरू होती तयारी
author img

By

Published : Aug 2, 2022, 11:38 AM IST

Updated : Aug 2, 2022, 11:53 AM IST

नवी दिल्ली: अल-कायदाचा म्होरक्या आणि जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक असलेल्या अयमान अल-जवाहिरीला अमेरिकेने ठार केले आहे. त्याने ओसामा बिन लादेनसोबत 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिडेन यांनी सोमवारी संध्याकाळी त्याचा खात्मा केल्याची घोषणा केली. जवाहिरी शनिवारी काबूलमध्ये सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात ठार झाल्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर अमेरिकी अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुप्त मिलीटरी ऑपरेशन - गेल्या ऑगस्टमध्ये अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर हे पहिले सर्वांना माहिती करुन देण्यात आलेले मिलीटरी ऑपरेशन आहे. बिडेन प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ते अफगाणिस्तानमध्ये दहशतवादविरोधी कारवाया सुरू ठेवतील. व्हाईट हाऊसच्या बाल्कनीतून थेट टेलिव्हिजन संबोधित करताना, बिडेन यांनी जाहीर केले की काही दिवसांपूर्वी त्यांनी जवाहिरीला मारण्यासाठी हवाई हल्ल्याला मान्यता दिली होती. बिडेन म्हणाले की, आता न्याय मिळाला आहे, हा दहशतवादी नेता राहिला नाही.

बाल्कनीत येताच ड्रोनने क्षेपणास्त्रे डागली - शनिवारी रात्री ९.४८ वाजता त्याच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवाहिरी आपल्या कुटुंबियांसोबत काबूलमधील सुरक्षितपणे राहत होता. त्याच्यावर सीईएची नजर होती. तो बाल्कनीत येताच ड्रोनने जवाहिरीवर दोन हेलफायर क्षेपणास्त्रे डागण्यात आली. मध्य काबूलच्या शिरपूर परिसरात ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले. बराच काळ हा अफगाण संरक्षण मंत्रालयाच्या मालकीचा प्रदेश होता. अलिकडच्या काही वर्षात मोठ्या घरांसह एक विशेष निवासी क्षेत्रात या भागाचे रूपांतर करण्यात आले. या भागात अनेक अफगाण अधिकारी आणि श्रीमंत लोक राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

'सेफ हाऊस' चे मॉडेल - सीआयएने जवाहिरीचा सेफ हाऊसपर्यंत माग काढल्याचे अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले. सीआयएने त्याची ओळख पडताळण्यात आणि त्याच्या हालचाली आणि वर्तनाचा मागोवा घेण्यात बराच वेळ घालवला. सीआयएचे गुप्तचर एजंट जवाहिरीच्या लाईफ स्टाईलचा कसून अभ्यास करत होते. गुप्तचरांनी 'सेफ हाऊसचे' मॉडेलही बनवले. ज्याचा उपयोग बायडेन यांना हा हल्ला कसा करता येईल हे सांगण्यासाठी करण्यात आला. सीआयएने स्ट्राइकमध्ये इतर कोणीही मारले जाणार नाही याची खात्री केली. या हल्ल्यात एकाच घरात राहणाऱ्या जवाहिरीच्या कुटुंबातील कोणालाही इजा झाली नसल्याचा दावा या अधिकाऱ्याने केला आहे.

हल्ल्यापूर्वी महत्वपूर्ण चर्चा - अधिकाऱ्याने सांगितले की, वरिष्ठ प्रशासन आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिकाऱ्यांना एप्रिलच्या सुरुवातीला जवाहिरीच्या घरात असल्याची माहिती देण्यात आली होती. मे आणि जूनमध्ये सीआयएकडून बायडेन यांनाआणखी माहिती देण्यात आली. 1 जुलै रोजी, त्यांना व्हाईट हाऊसमध्ये ही माहिती देण्यात आली. यावेळी CIA संचालक विल्यम जे. बर्न्स, नॅशनल इंटेलिजन्सचे डायरेक्टर एव्हरिल हेन्स, नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचे डायरेक्टर क्रिस्टीन अबीझाईड आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन उपस्थित होते.

नेमकेपणाने टिपले - अधिकाऱ्याने सांगितले की, अध्यक्षांनी 25 जुलै रोजी त्यांच्या वरिष्ठ सल्लागारांची पुन्हा भेट घेतली. त्यांनी सीआयएला हल्ल्यात कोणत्याही नागरिकाला इजा होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे. संपूर्ण योजनेचा अभ्यास केल्यानंतर, अधिकाऱ्याने सांगितले की त्यांच्या सर्व सल्लागारांनी हल्ल्याला अनुमती दिली आणि बिडेन यांनी परवानगी दिली. अधिकार्‍याने सांगितले की, हक्कानी तालिबान गटातील वरिष्ठ सदस्यांनाही जवाहिरी घरात राहत असल्याची माहिती होती. या अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवादी नेत्याची काबूलमध्ये उपस्थिती हे युनायटेड स्टेट्स आणि तालिबानने बीजारोपण केलेल्या दोहामध्ये झालेल्या 2020 च्या कराराचे उल्लंघन आहे.

हेही वाचा - Al Qaeda leader death : सीआयएच्या ड्रोन हल्ल्यात अलकायदाचा दहशतवादी अल-जवाहरी अफगाणिस्तानात ठार

Last Updated : Aug 2, 2022, 11:53 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.