ETV Bharat / international

पाकिस्तानचा इराणवर हवाई हल्ला, 7 जणांचा मृत्यू - आर्मी

Pakistan Attack On Iran : पाकिस्तानने इराणवर हवाई हल्ला केलाय. यात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

Pakistan Air Strikes
हवाई हल्ला
author img

By ANI

Published : Jan 18, 2024, 9:29 PM IST

इस्लामाबाद Pakistan Attack On Iran : पाकिस्तानने इराणवर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांची अनेक ठिकाणं उद्ध्वस्त झाल्याची माहिती आहे. मात्र, हा हल्ला कुठे, किती आणि कोणाच्या निशाण्यावर करण्यात आला, हे पाकिस्तानकडून अद्याप सांगण्यात आलेलं नाही.

इराणचेही पाकिस्तानवर हल्ले : 5 वर्षांपूर्वी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. भारतानंतर इराणनेही पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले आहेत. पाकिस्ताननेही इराणमधील बलुच दहशतवादी गटांवर हवाई हल्ले करून प्रत्युत्तर दिल्याची माहिती मिळतेय. यापूर्वी इराणने पाकिस्तानवर हवाई हल्ला केला होता. पाकिस्तानातील राजकीय लोक आणि सर्वसामान्य जनता याविरोधात सोशल मीडियावर सातत्याने निषेध करत आहे. आता पाकिस्तानातून इराणमध्ये हवाई हल्ल्याची बातमी आलीय.

पाकिस्तानने केले आरोप : या हल्ल्याबाबत पाकिस्तान सरकारकडून सध्या कोणतेही अधिकृत वक्तव्य देण्यात आलेलं नाही. हा हल्ला कुठे, कोणावर आणि केव्हा करण्यात आला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. इराण दहशतवादी संघटनांना आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तानने यापूर्वी केला होता. तर इराणनेही पाकिस्तानवर असेच आरोप केले होते.

हल्ल्यात दहशतवाद्यांचं मोठं नुकसान : इराणमध्ये बीएलए दहशतवाद्यांच्या अनेक लपलेल्या ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. पाकिस्तानी माध्यमांचा दावा आहे की, इराणमध्ये घुसल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि बलुचिस्तान लिबरेशन फोर्स आणि इतर दहशतवादी संघटनांचे अनेक ठिकाणं उडवून दिले आहेत. या हल्ल्यांमध्ये दहशतवाद्यांचे मोठं नुकसान झालंय.

इराणच्या हल्ल्यात दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त : इराणनं केलेल्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यात पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे दोन मुख्यालयं उद्ध्वस्त करण्यात आल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली. बलुचिस्तानात जैश अल अदलचे सर्वात मोठे मुख्यालय होते. असं वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तात स्पष्ट करण्यात आलं होतं.

हेही वाचा -

  1. BSF soldiers on Indo Pak border : भारत-पाक सीमेवर जवानांची सहनशक्ती पाहा.. कडक उन्हात ठेवलेला पापड एका मिनिटात भाजतो!
  2. विशाखापट्टणम पाकस्तान हेरगिरी प्रकरण ; एनआयएनं मुंबईतून एका आरोपीला केलं अटक
  3. Kargil Vijay Diwas 2023: पाक असो चीन सर्वांशी मुकाबला करण्यास सैन्य सिद्ध - माजी लष्करप्रमुख व्हीपी मलिक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.