तेहरान - युक्रेनला जाणारे विमान चुकीने पाडल्याचे इराणने मान्य केले आहे. मानवी चुकांमुळे हा अपघात घडल्याचे इराकच्या लष्कराने मान्य केले आहे. याबाबतचे वृत्त इराणच्या सरकारी माध्यमांनी दिले आहे.
-
Iran state TV, citing military, says country 'unintentionally' shot down Ukrainian jetliner because of human error: The Associated Press pic.twitter.com/HhPUZemVgD
— ANI (@ANI) January 11, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Iran state TV, citing military, says country 'unintentionally' shot down Ukrainian jetliner because of human error: The Associated Press pic.twitter.com/HhPUZemVgD
— ANI (@ANI) January 11, 2020Iran state TV, citing military, says country 'unintentionally' shot down Ukrainian jetliner because of human error: The Associated Press pic.twitter.com/HhPUZemVgD
— ANI (@ANI) January 11, 2020
इराण सैन्याच्या अंतर्गत तपास पथकाने मानवी चुकीमुळे युक्रेनचे विमान कोसळल्याची माहिती दिली. चुकीने क्षेपणास्त्र विमानावर डागल्याने हा भयंकर अपघात घडला. या प्रकरणी तपास सुरू असून ही अक्ष्यम चूक असल्याचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी सांगितले.
युक्रेनचे प्रवासी विमान इराणची राजधानी तेहरानजवळ ८ जानेवारीला कोसळले होते. तेहरानमधील इमाम खोमेनी विमानतळाजवळच विमान कोसळले होते. या दुर्घटनेत विमानातील कर्मचाऱ्यांसह सर्व १७६ जणांचा मृत्यू झाला होता. बोईंग कंपनीचे विमान उड्डान घेतल्यानंतर थोड्याच वेळात तेहरानच्या नैऋत्येकडील परांद या भागात कोसळले होते. या विमानामध्ये ८२ इराणी, ६३ कॅनडाचे नागरिक असल्याची माहिती युक्रेनच्या मंत्र्यांनी दिली होती.
युक्रेनचे आंतरराष्ट्रीय विमान फ्लाईट ७५२ स्थानिक वेळेनुसार सकाळी ५.१५ ला तेहरान विमानतळावरून उड्डाण घेणार होते. मात्र, एक तास उशिराने विमानाने उड्डाण घेतले होते. युक्रेनची राजधानी कीव येथील बोरीसपील विमानतळावर हे विमान उतरणार होते, मात्र, उड्डाण घेतल्यानंतर थोड्याच वेळात ते कोसळले होते.