कैरो - पर्यटकांनी भरलेल्या एका बसचा इजिप्तमधील ऐन सोखना येथे अपघात झाला. या बसमध्ये १६ भारतीयही होते, अशी माहिती कैरोमधील भारतीय दूतावासाने दिली आहे.
भारतीय दूतावासाने ट्विटरवरून ही माहिती दिली. १६ भारतीयांसह इतर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या बसचा ऐन सोखना येथे अपघात झाला आहे. दूतावासाचे कर्मचारी सुएझ आणि कैरो येथील रूग्णालयांमध्ये उपस्थित आहेत. अशा आशयाचे हे ट्विट आहे. यासोबत या ट्विटमध्ये दोन हेल्पलाईन क्रमांकही दिले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी देशाचे परराष्ट्र मंत्रालय, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि परराष्ट् राज्य मंत्री यांनाही टॅग केले आहे.
-
Bus accident with 16 Indian tourists on board occured today near Ain Sokhna in Egypt. Embassy officials are at hospitals in Suez city and Cairo. Helpline numbers +20-1211299905 and +20-1283487779 are available. @DrSJaishankar @MEAIndia @CPVIndia @MOS_MEA
— India in Egypt (@indembcairo) December 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bus accident with 16 Indian tourists on board occured today near Ain Sokhna in Egypt. Embassy officials are at hospitals in Suez city and Cairo. Helpline numbers +20-1211299905 and +20-1283487779 are available. @DrSJaishankar @MEAIndia @CPVIndia @MOS_MEA
— India in Egypt (@indembcairo) December 28, 2019Bus accident with 16 Indian tourists on board occured today near Ain Sokhna in Egypt. Embassy officials are at hospitals in Suez city and Cairo. Helpline numbers +20-1211299905 and +20-1283487779 are available. @DrSJaishankar @MEAIndia @CPVIndia @MOS_MEA
— India in Egypt (@indembcairo) December 28, 2019
इजिप्तमधील एका स्थानिक वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात २२ ठार तर आठ जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये भारतीयांचाही समावेश आहे, मात्र त्यांची नेमकी संख्या कळू शकली नाही.
हेही वाचा : कझाकिस्तान विमान दुर्घटना, 15 ठार तर ६६ जखमी..