ETV Bharat / international

तुर्की : भूकंपामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा 114 वर, बचावकार्य पूर्ण - तुर्की फॉल्ट लाईन्स न्यूज

एएफएडीचे प्रमुख मेहमेट गुल्लोओग्लू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले की, कोसळलेल्या सर्व 17 इमारतींमधील बचावकार्य पूर्ण झाले आहे. इझमिरच्या महापौरांनी 'वन रेंट वन होम' नावाची मोहीम सुरू केली आहे. भूकंपग्रस्त आणि बेघर झालेल्या लोकांना राहण्यासाठी घरे देणे हा याचा उद्देश आहे. 'ज्या नागरिकांना भाड्याने राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून हवी असेल किंवा आपापली घरे उघडायची आहेत, ते ऑनलाईन नोंदणी करू शकतात,' असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

तुर्की भूकंप लेटेस्ट न्यूज
तुर्की भूकंप लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Nov 4, 2020, 7:53 PM IST

अंकारा - पश्चिम तुर्कीमधील इझमिर प्रांतात झालेल्या या भूकंपातील मृतांचा आकडा 114 झाला आहे. तर 1 हजार 35 लोक जखमी झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. यापूर्वी प्राधिकरणाने सांगितले होते की, 107 लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.

सिन्हुआ या वृत्तसंस्थेनुसार, आपत्ती व आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एएफएडी) आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जखमींपैकी 137 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एएफएडीचे प्रमुख मेहमेट गुल्लोओग्लू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर जाहीर केले आहे की, कोसळलेल्या सर्व 17 इमारतींमधील बचावकार्य पूर्ण झाले आहे.

'वन रेंट वन होम' मोहीम

इझमिरच्या महापौरांनी 'वन रेंट वन होम' नावाची मोहीम सुरू केली आहे. भूकंपग्रस्त आणि बेघर झालेल्या लोकांना राहण्यासाठी घरे देणे हा याचा उद्देश आहे. 'ज्या नागरिकांना भाड्याने राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून हवी असेल किंवा आपापली घरे उघडायची आहेत, ते ऑनलाईन नोंदणी करू शकतात,' असे त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे.

शुक्रवारी झाला होता भूकंप

तुर्कीच्या एजियन किनारपट्टीवर आणि ग्रीस बेटावरील सामोसच्या उत्तरेकडे शुक्रवारी दुपारच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला होता. तुर्कीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपातची तिव्रता 6.6 रिस्टर स्केल इतकी नोंदवली गेली होती. तर, इतर भूकंपशास्त्र संस्थांनी ती 6.9 असल्याचे सांगितले. या भूकंपामुळे तुर्कीमधील तिसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या इझमिरमधील इमारती पडल्या आणि सेफेरिहिसार जिल्ह्यात आणि ग्रीक बेटांवर त्सुनामी आली. त्यानंतर शेकडो कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्केही बसले.

या कारणाने झाला भूकंप

तुर्कीच्या मधून फॉल्ट लाईन्स (भूकंप रेषा) गेल्या आहेत त्यामुळे येथे भूकंपप्रवण क्षेत्र निर्माण झाले आहे. येथे वारंवार भूकंप होण्याची शक्यता आहे. येथे 1999 मध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांनी वायव्य तुर्कीमध्ये सुमारे 18,000 लोकांचा बळी घेतला. याशिवाय, ग्रीसमध्येही भूकंप वारंवार होतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.