दमास्कस - सीरियात मध्यरात्री झालेल्या इस्रायली हवाई हल्ल्यात सहा सरकार समर्थक सैनिक ठार झाले.
सिन्हुआ वृत्तसंस्थेनुसार, इस्रायलच्या सीरियन मानवाधिकार निरीक्षण संस्थेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, इस्रायली क्षेपणास्त्र हल्ल्याने शुक्रवारी हमा प्रांतातील मासियाफ शहरात वैज्ञानिक संशोधन केंद्र असलेल्या संरक्षण साहित्यांच्या कारखान्यांना लक्ष्य केले.
हेही वाचा - तुर्कीच्या सुरक्षा दलाने आयएसच्या 34 संशयित दहशतवाद्यांना घेतले ताब्यात
वॉचडॉग समूहाने म्हटले आहे की, या हल्ल्यांमुळे इराणी सैनिकांकडून चालविण्यात येणारा शस्त्रास्त्रांचा डेपो नष्ट झाला.
आपल्या हवाई बचाव पथकाने मासियफवर डागल्या गेलेल्या बहुतांश इस्रायली क्षेपणास्त्रांना रोखले आहे, असे सीरियन लष्कराने म्हटले आहे.
सीरियन संकटादरम्यान इस्रायलने इराणच्या तळांना लक्ष्य करण्यासह सीरियन सैन्याच्या तळांवर शेकडो हवाई हल्ले केले आहेत.
हेही वाचा - इथिओपियातील हल्ल्यात 100 हून अधिक लोक ठार : मानवाधिकार गट